मस्साजोगच्या गावकऱ्यांचा अत्यंत धक्कादायक निर्णय, बघून पोलीसही हादरले

Santosh Deshmukh Murder case Jalasamadhi movement of Massajog villagers  

Santosh Deshmukh Murder case | बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सीआयडीकडून तपास सुरू आहे. कालच (31 डिसेंबर) या घटनेतील मास्टरमाइंड वाल्मिक कराड याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.कराड स्वत:हून पुण्याच्या सीआयडी कार्यालयात सरेंडर झाला.त्यानंतर त्याला बीडमधील केज कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टाने कराडला पोलीस कोठडी सुनावली आहे. सरपंच हत्या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असताना दुसरीकडे बीडमधील मस्साजोगच्या गावकऱ्यांनी वेगळाच निर्णय घेतल्याचं दिसून येतंय. (Santosh Deshmukh Murder case )

आज 1 जानेवारीरोजी बीडच्या मस्साजोगमधील गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं. यावेळी एका आंदोलक महिलेची प्रकृती बिघडल्याची घटना घडली आहे. तिला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.या आंदोलनाबाबत कालच गावकऱ्यांची इशारा दिला होता. यामुळे बीडमधील वातावरण आणखीनच तापले आहे.

मस्साजोग गावकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन

वाल्मिक कराड हा स्वतः काल सरेंडर झाला. मात्र, या घटनेतील 3 आरोपी अजूनही फरार आहेत. त्यांना अटक कधी करणार?, याचा संताप म्हणून आज मस्साजोगमधील गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं. अजून या आरोपींना अटक का करण्यात आलेली नाही, असा प्रश्न उपस्थित करत गावकरी आंदोलन करत आहेत. (Santosh Deshmukh Murder case )

जोपर्यंत या तिन्ही आरोपींना अटक करण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही तलावातून बाहेर येणार नाही असा पवित्राच या गावकऱ्यांनी घेतलाय. विशेष म्हणजे यामध्ये लहान मोठ्यांपासून महिला वृद्ध सगळेच सहभागी झाले आहेत. अनेक जण हे तलावात उतरून आंदोलन करत आहेत.

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे यांना अटक करण्यात आली आहे. तर, मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे फरार आहेत. तर वाल्मिक कराडला कालच ताब्यात घेण्यात आलंय. त्याची आता चौकशी सुरू आहे. (Santosh Deshmukh Murder case )

News Title :  Santosh Deshmukh Murder case Jalasamadhi movement of Massajog villagers  

महत्त्वाच्या बातम्या-

सरपंच हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले संदर्भात मोठी अपडेट समोर!

‘इथे सापडला की ठोकला’; वाल्मिक कराड शरण आल्यानंतर वसंत मोरेंचं मोठं वक्तव्य

बीड प्रकरणाशी धनंजय मुंडेंच्या जोडल्या जाणाऱ्या कनेक्शनवर अजितदादांच्या नेत्याचं मोठं भाष्य!

“खालचा अधिकारी उचलून खंडणी…”; सुरेश धसांनी वाल्मिक कराडचे कारनामेच केले उघड

यंदाच्या वर्षी कोणता सण किती तारखेला? पाहा सर्व सणांच्या तारखा एका क्लिकवर

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .