’20 मिनिटांत आणून सोडतो म्हणत 36 व्या काॅलनंतर…’; सुरेश धस यांचा धक्कादायक खुलासा!

Suresh Dhas

Santosh Deshmukh | बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या केल्याची घटना 9 डिसेंबर 2024 ला घडली होती. या घटनेनं राज्यभरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मात्र देशमुख यांची हत्या होऊन अनेक दिवस उलटले असले तरी देखील हे प्रकरण अजूनही तापलेलं दिसत आहे. या घटनेत पोलिसांकडून नवनवीन माहिती समोर येत आहे. याचवेळी भाजप आमदार सुरेश धस यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे.

“डायरेक्ट संतोषची बाॅडी…”

गेल्या महिन्याभरापासून राज्यात संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्येप्रकरणात वातावरण तापलेलं आहे. एवढंच नाही तर, राजकीय वर्तुळात देखील याबद्दल विरोधकांकडून आरोप प्रत्योरोप होत आहे. दरम्यान, एक मुलाखतीमध्ये बोलत असताना सुरेश धस यांनी या प्रकरणाबाबत मोठा खुलासा केला आहे. बोलत असताना धस म्हणाले की, संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यावर त्यांचा भाऊ धनंजय यांनी विष्णु चाटेला काॅल केला होता.

यावेळे, दर 20 मिनिटाला काॅल केल्यावर चाटे म्हणायचा की, संतोषला आणून देतो. त्यानंतर धनंजय आणि चाटेचे 35 वेळा काॅल झाला, आणि 36 व्या काॅलनंतर, डायरेक्ट संतोषची बाॅडी दिली. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणातील आका हे वाल्मिक कराड आहेत. तर आकाचे आका हे मंत्री धनंजय मुंडे आहेत, असं वक्तव्य भाजप आमदार सुरेश धस यांनी केलं आहे.

अंबानी यांना विचारणार-

सुरेश धस पुढे म्हणाले की,अदानी आणि अंबानी सुद्धा वापरत नसतील तेवढे मोबाईल वाल्मिक कराड वापरत आहेत. तसेच मी अंबानी यांना देखील विचारायला जाणार आहे की, तुम्ही नेमके किती मोबाईल वापरता? तसेच नीताताईंना जावून विचारतो. अंबानी यांचे कुणी पीए असतील यांना देखील विचारतो.

याशिवाय आता रतन टाटा यांच्या चिरंजीवांना जावून नतमस्तक होवून त्यांना देखील जाऊन विचारतो की, तुम्ही किती मोबाईल वापरता? कारण आमचे वाल्मिक आण्णा कराड हे तब्बल 17 मोबाईल वापरतात. त्यांचे 100 बँक अकाउंट सापडले आहेत. तसेच त्या अकाउंटमध्ये तब्बल 1000 कोटी पक्षा जास्त पैसे असतील, असा मोठा दावा सुरेश धस यांनी केला आहे.

News Title : santosh deshmukh murder case new update

आता आरोपींची खैर नाही, संतोष देशमुख हत्या प्रकरणी SIT ला मिळाला महत्त्वाचा पुरावा

मुंडे-कराडांच्या जमिनी कुठे-कुठे? सुरेश धस यांनी केला धक्कादायक गौप्यस्फोट

संतोष देशमुखांच्या हत्येचं 3333 कनेक्शन, खळबळजनक माहिती समोर

लिव्हरचे 4 तुकडे, मान तुटलेली, बरगड्या पण…, मुकेश चंद्राकरच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टने सगळे हादरले

सीआयडीच्या मोठ्या हालचाली, वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होणार?

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .