बीडचा वणवा राज्यभर पेटणार?, सरपंच हत्येप्रकरणी विरोधकांचा एल्गार

Sudarshan Ghule

Santosh Deshmukh Murder Case | बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन महाराष्ट्रातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावरून सत्ताधारी महायुतीला विरोधकांनी चांगलेच धारेवर धरले आहे. या घटनेविरोधात आता मराठा क्रांती मोर्चाने देखील संताप व्यक्त केलाय. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मुंबईतील लालबागमध्ये मराठा क्रांती मोर्चा मुंबईच्या वतीने मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. (Santosh Deshmukh Murder Case)

तसेच, येत्या 28 तारखेला बीडमधे सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार असून यात महाविकास आघाडीतील अनेक बड्या नेत्यांचा सहभाग असणार आहे. बीडचा बिहार होत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. बीडमध्ये अराजकता, दहशत ,गुंडागर्दी आणि खंडणीचे प्रकार वाढल्याचे गंभीर आरोप केले जात आहेत.याविरोधात विरोधक आता प्रचंड आक्रमक झाले आहेत.

बीडसह प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा निघणार

बीड घटनेच्या निषेधार्थ आज मुंबईतील लालबागमध्ये आंदोलनाला सुरुवात होत असून या मोर्च्यातून वाल्मिक कराड (Walmik Karad) यांना अटक करा, अशी मागणी केली जाणार आहे.तसेच, बीडला होणाऱ्या मोर्चा पूर्वी प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहीत आहे. म्हणजेच बीडचा वणवा आता राज्यभरात पसरणार असल्याचं बोललं जातंय. (Santosh Deshmukh Murder Case)

या सर्व घटनेत पोलीसांच्या निष्क्रियतेवर देखील विरोधक संतापले आहेत. याविरोधात आता शनिवारी बीडमध्ये मोर्चा काढण्यात येणार असून त्यात शरद पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेते सहभागी होणार आहे. बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी आज (25 डिसेंबर) पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

“आता अजितदादांनीच बीडचं…”

तसेच, 1 तारखेपासून तपास नाही लागला तर मी उपोषणाला बसेन. जोपर्यंत प्रकरणाचा छडा लागणार नाही, तोपर्यंत उठणार नाही, अशी भूमिका सोनवणे यांनी जाहीर केली आहे.त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरकारकडे काही मागण्या देखील केल्या आहेत. (Santosh Deshmukh Murder Case)

पुढे त्यांनी बीडच्या पालकमंत्री पदाबाबतही भाष्य केलं. जिल्ह्याचे पालकमंत्री कुणाला करावं, हा सत्ताधारी पक्षाचा विषय असून तिन्ही पक्ष त्याबाबत निर्णय घेतील. मात्र खरंच या प्रकरणाचा तपास करायचा असेल तर अजित दादा यांच्या राष्ट्रवादी गटाचे जिल्ह्यात तीन आमदार आहेत. त्यामुळे अजित दादांनी या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारावं, अशी मागणीही खासदार बजरंग सोनावणे यांनी केली.

News Title –  Santosh Deshmukh Murder Case Opponents March

महत्त्वाच्या बातम्या-

देवेंद्र फडणवीसांचा थेट इशारा, धनंजय मुंडेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत?

संतोष देशमुखांच्या हत्येविरोधात विरोधक प्रचंड आक्रमक! घेतला सर्वात मोठा निर्णय

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण योजनेची केली घोषणा

“संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं”; नवीन खुलासा समोर

“1500 रुपये देण्यासाठी बहीणींच्या नवरे व भावांना बेवडे बनवणार”; ‘या’ नेत्याचा हल्लाबोल

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .