Santosh Deshmukh l संतोष देशमुख खून प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी डिसेंबर महिन्यात बालाजी तांदळेची (Balaji Tandale) स्कॉर्पिओ गाडी (Scorpio Car) वापरल्याची माहिती समोर आली आहे.
गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांनी 15 डिसेंबर रोजी या संदर्भात पत्र दिले होते, ज्याच्या प्रती पोलीस हवालदारांनाही देण्यात आल्या होत्या. त्यामुळे बालाजी तांदळेवरील (Balaji Tandale) आरोप खरे की खोटे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलिसांनी (Police) बालाजी तांदळेची (Balaji Tandale) गाडी का वापरली? :
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला ओळखणारी व्यक्ती सोबत असावी म्हणून त्यांनी बालाजी तांदळेची (Balaji Tandale) गाडी वापरली. मात्र, संशयित आरोपीची गाडी वापरल्याने पोलिसांच्या (Police) कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) वारंवार बालाजी तांदळेवर (Balaji Tandale) आरोप करत असताना पोलिसांनी त्याची गाडी वापरल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
Santosh Deshmukh l धनंजय देशमुख यांचा बालाजी तांदळेवर आरोप :
संतोष देशमुख हत्या प्रकरणात बालाजी तांदळेला (Balaji Tandale) सहआरोपी करावे, अशी मागणी धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी केली आहे. बालाजीने (Balaji) आरोपींचा जामीन घेतला नसता, तर ही घटना घडलीच नसती, असेही धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) म्हणाले. वाल्मिक कराडचे (Valmik Karad) सहकारी आणि कारेगावचे सरपंच बालाजी तांदळेची (Balaji Tandale) गाडी वापरल्याने संतोष देशमुख खून प्रकरणाच्या तपासाला नवे वळण लागले आहे.
बालाजी तांदळेचा (Balaji Tandale) इन्कार :
धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी बीड शहर पोलीस ठाण्यात (Beed City Police Station) काही व्यक्ती वाल्मिक कराडच्या (Valmik Karad) कोठडीपर्यंत जात असल्याचा आरोप केला होता. यावर बालाजी तांदळेने (Balaji Tandale) सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपण पोलीस ठाण्यात (Police Station) असताना वाल्मिक कराडला (Valmik Karad) भेटलो नाही, असे बालाजी तांदळेने (Balaji Tandale) म्हटले आहे.