Santosh Deshmukh Murder Case | भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) हत्या प्रकरणातील आरोपींना तुरुंगात VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, “जेलमध्ये वाल्मिक कराड (Walmik Karad) याला मटण आणि मोठ्या बॅग भरून वस्तू दिल्या जात आहेत. त्यामुळे तुरुंग प्रशासनातील संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे.”
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात
संतोष देशमुख हत्या प्रकरणात ९ आरोपींवर भा.दं.वि. कलम ३०२ (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल आहे, आणि दहाव्या आरोपीवरही कलम ३०२ अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी धस यांनी केली.
तसेच, या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला (Krishna Andhale) लवकरात लवकर अटक करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सुरेश धस यांनी पोलिस तपासाबाबत केलेल्या मागण्या-
“PI महाजन (PI Mahajan) आणि PSI राजेश पाटील (PSI Rajesh Patil) यांना बडतर्फ करावे.”
“सायबर सेलचे दोन तज्ज्ञ SIT मध्ये नेमावेत.”
“कुणाचे कुणासोबत फोन कॉल झाले, याचा सखोल तपास व्हावा.”
“PSI राजेश पाटील याला आरोपी करा”
सुरेश धस यांनी PSI राजेश पाटीलवर गंभीर आरोप करत, त्यालाही आरोपी करण्यात यावे, अशी मागणी केली.
त्यांच्या म्हणण्यानुसार, “PSI राजेश पाटील याने संतोष देशमुख यांचा मृतदेह कळंब (Kalamb) कडे वळवण्याचा प्रयत्न केला होता, पण ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर गाडी परत वळवण्यात आली. त्यामुळे त्याला आरोपी करणे गरजेचे आहे.” (Santosh Deshmukh Murder Case)
“नितीन बिक्कडने आरोपींना मदत केली, त्याच्यावरही कारवाई व्हावी”
धस यांनी पुढे सांगितले की, “नितीन बिक्कड (Nitin Bikkad) याने आरोपींना पळून जाण्यास मदत केली, त्यामुळे त्यालाही आरोपी करणे आवश्यक आहे.”
Title : Santosh Deshmukh Murder Case Suresh Dhas Alleges VIP Treatment for Accused