सरपंच हत्या प्रकरणात मोठा पुरावा हाती, वाल्मिक कराडचा पाय खोलात?

Santosh Deshmukh Murder Case update extortion call recording in front

Santosh Deshmukh Murder Case | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात आहे. अशात कराड विरोधात तपास यंत्रणेला एक मोठा पुरावा मिळाला आहे. वाल्मिक कराडसंबंधी (Walmik Karad) एक फोन कॉल रेकॉर्डिंग तपास यंत्रणेच्या हाती लागली आहे. या अनुषंगाने आता पुढील तपास सुरू आहे. आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे विष्णू चाटे याच्या मोबाईलवरून दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. (Santosh Deshmukh Murder Case)

तपास यंत्रणेला असे एक कॉल रेकॉर्डिंग मिळाले आहे. सीआयडी या आवाजाचा नमुना तपासणार आहे. हा आवाज कराडचाच आहे का, याचा आता तपास केला जाणार आहे. आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला मागणी पूर्ण न झाल्यास हातपाय तोडण्यासह कायमची वाट लावण्याची धमकी देखील देण्यात आल्याचा कराडवर आरोप ठेवण्यात आला आहे. आता जर हे वॉइस सॅम्पल जुळले तर कराडच्या अडचणी आणखी वाढू शकतात.

कॉल रेकॉर्डिंगमधील आवाजाची तपासणी होणार

आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत सुनील शिंदे हे प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्याकडे केज तालुक्यातील विविध ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम आहे. 29 नोव्हेंबर 2024 रोजी शिंदे यांच्या मोबाईलवर विष्णू चाटे याने फोन केला होता.तेव्हा वाल्मिक अण्णा बोलणार असल्याचे शिंदे यांना सांगण्यात आले होते. सुनील शिंदे यांना धमकी देण्यात आली होती.

तर त्याच दिवशी सुदर्शन घुले आवादाच्या साईटवर पोहचला. काम बंद करा, नाहीतर तुमचे हातपाय तोडू. काम सुरू ठेवायचे असतील तर दोन कोटी रुपये द्या असे त्याने सांगितले. याबाबतचे सर्व कॉल रेकॉर्डिंग शिंदे यांच्या मोबाईलमध्ये झाले.याचाच तपास आता सीआयडी करत आहे.त्यातील आवाज कराडचा असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे कराडच्या वॉइस सॅम्पलची आणि त्या कॉल रेकॉर्डिंगची तपासणी केली जाणार आहे. (Santosh Deshmukh Murder Case)

सरपंच हत्ये प्रकरणात किती जणांना अटक?

दरम्यान, सध्या कराडवर फक्त 2 कोटींची खंडणी मागीतल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. मात्र, सरपंच हत्या प्रकरणात तोच मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला जातोय. आतापर्यंत सरपंच हत्याकांड प्रकरणी कराडसोबत जयराम माणिक चाटे, महेश सखाराम केदार, प्रतिक घुले, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे आणि सिद्धार्थ सोनावणे यांना देखील अटक झाली आहे. (Santosh Deshmukh Murder Case)

News Title : Santosh Deshmukh Murder Case update extortion call recording in front

महत्वाच्या बातम्या –

लग्नसराईत दागिने घ्यायचा विचार करताय?, पाहा लेटेस्ट 1 ते 10 ग्रॅम सोन्याचे दर

भयंकर! वर्षभराच्या बाळासह कुटुंबातील 5 जणांची हत्या, नंतर मृतदेह गोणीत भरून…

आज पुत्रदा एकादशी, भगवान विष्णू ‘या’ राशींवर करणार सुखाचा वर्षाव!

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजितदादांनी मौन सोडले!

पुण्यातील मगरपट्टा ते एफसी रोड, आकाची संपत्ती किती?

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .