Santosh Deshmukh | महिन्याभरापूर्वी मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. या हत्येमधील आरोपींना काही दिवसांपूर्वी पोलिसांनी पुण्यात अटक केली आहे. यावेळी त्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी देशमुख कुटुंबीय आणि स्थानिक सरकारकडे मागणी करत आहे. मात्र, सध्या त्यांना पोलिस कोठडी सुनावली असून, त्यांची SIT कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, चौकशी सुरू असताना नवनवीन खुलासे समोर येत आहे. यावेळेस, संतोष देशमुख यांचा एक व्हिडीओ आरोपींच्या मोबाईलमध्ये होता.
व्हिडीओमध्ये काय आहे?
संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ आरोपींच्या मोबाईलमध्ये होते. ते व्हिडीओ आरोपींनी मोबाईलमधून डिलीट केले होते. संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडीओ एसआयटीने रिकव्हर केले. त्या व्हिडीओमध्ये आरोपी संतोष देशमुख यांना मारत होते आणि आनंद लुटत होते, असं दिसत असल्याचं एसआयटीने म्हटलं आहे. आरोपींच्या फोनमध्ये हे व्हिडिओ होते. ते आरोपींना डिलीट केले होते. आता ते रिकव्हर करण्यात SIT ला यश आलं आहे. एसआयटीने हे पुरावे न्यायालयात सादर केले.
संतोष देशमुखांना मारहाण करण्यासाठी नेमकी कोण कोणती हत्यार वापरली. याची तपशीलवार माहिती कोर्टासमोर मांडण्यात आलेली आहे. देशमुखांना मारहाण करताना 41 इंचाचा एक गॅसचा पाईप ज्याचा एका बाजूला काळ्या करदोड्याने मूठ तयार केली होती. लोखंडी तारेचे 5 क्लस वायर बसवलेली एक मूठ. एक लाकडी दांडा, तलवारीसारखं शस्त्र, चार लोखंडी रॉड आणि एक कोयता, लोखंडी फायटर आणि धारधार कत्ती.
धनंजय देशमुख यांनी ती याचिका मागे घेतली-
सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणानंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे. कारण या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करा आणि त्याच्यावर मोक्का लावावा, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी याचिकेत केली होती.
याशिवाय धनंजय देशमुख यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी याचिकेत केली होती. मात्र आता त्यांनी ती याचिका मागे घेतली आहे. कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सध्या सुरू असलेल्या तपासावर बऱ्यापैकी समाधानी असल्याचे मत धनंजय देशमुख यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळेच त्यांनी ही याचिका मागे घेतली आहे.
News Title : Santosh Deshmukh murder case video get recoverd by SIT
महत्त्वाच्या बातम्या-
HMPV व्हायरसमुळे पुणे महापालिकेने घेतला मोठा निर्णय!
मोठी बातमी! सरपंच संतोष देशमुख यांचा मारहाणीचा व्हिडीओ CID च्या हाती???
संतोष देशमुखांच्या भावाने ‘ती’ महत्वाची याचिका घेतली मागे!
‘या’ कारणास्तव आसाराम बापूला जामीन मंजूर!
मुंडे भाऊ-बहिणीविरोधात मराठा समाज आक्रमक, दोघांच्याही राजीनाम्याची केली मागणी