अजितदादा…धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाका; कोणी केली मागणी?

Ajit Pawar

Santosh Deshmukh Murder Case l बीड जिल्ह्यातील सरपंच हत्याकांड राज्यभर गाजलं आहे. केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती. मात्र या धक्कादायक घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता या घटनेचे पडसाद विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात देखील पडसाद उमटले आहेत.

ग्रामस्थांनी अजित पवारांकडे केली मोठी मागणी :

दरम्यान या हत्येप्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी व्हावी, तसेच पीडित कुटुंबाला देखील न्याय मिळावा अशी मागणी विरोधी पक्षातील आमदारांकडून करण्यात आली आहे. अशातच आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मस्साजोग या गावामध्ये जाऊन सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली आहे.

मात्र आता शरद पवार यांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आज सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली आहे. मात्र यावेळी ग्रामस्थ देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. मात्र यावेळी आमदार धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाका अशी जोरदार घोषणाबाजी गावकऱ्यांनी केली आहे.

Santosh Deshmukh Murder Case l या घटनेतील मास्टर मांइडला शोधणार :

याशिवाय आमदार धनंजय मुंडे यांनी पक्षपातीपणा देखील केला आहे. तसेच आता त्यांना मंत्रिमंडळातून देखील काढून टाका अशी मागणी येथील मस्साजोग गावच्या ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. तसेच यावेळी ग्रामस्थानं म्हटलं आहे की, ‘माझं म्हणण असं आहे की, देशभरात महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाचा दबदबा आहे. मात्र तेरा दिवस झाले तरी देखील या हत्येप्रकरणातील तीन आरोपी सापडत नाहीत. मात्र याचा अर्थ नेमका काय आहे? असा सवाल यावेळी ग्रामस्थाने उपस्थित केला आहे.

याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची आज भेट घेतली. तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी तुम्हाला शब्द देतो की, या प्रकरणातील मास्टर मांइड जो कोणी असेल तो मात्र सुटणार नाही असा शब्द अजित पवार यांनी दिला आहे.

News Title – Ajit Pawar Meet Santosh Deshmukh family

महत्त्वाच्या बातम्या-

“…तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही”, सरपंच हत्याप्रकरणावरून शरद पवारांनी सरकारला दिला इशारा

‘नोकरी टिकवायची असेल तर मला…’; ऑफिसमधल्या महिलेसोबत नक्की काय घडलं?

संतोष देशमुखांच्या कुटुंबाला शरद पवारांनी दिलं मोठं आश्वासन!

अजितदादांच्या राष्ट्रवादीत महाभूकंप होणार? अंतर्गत हालचाली वाढल्या

“आम्हाला न्याय हवाय”; देशमुख कुटुंबियांची शरद पवारांकडे मागणी

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .