वाल्मिक कराड नाहीतर हा आहे ‘आका’; वकिलाच्या दाव्यानं सगळीकडे खळबळ

Santosh Deshmukh Case

Santosh Deshmukh | बीडच्या केजमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी केसमध्ये वाल्मिक कराडला अटक झालेली आहे. कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे. खुद्द मुंडे यांनीदेखील तशी कबुली दिलेली आहे. भाजप आमदार सुरेश धस सातत्यानं आका असा उल्लेख मुंडे यांना लक्ष करत आहेत. आता या प्रकरणी वकिलांनी मोठा दावा केलाय. यामुळे सगळीकडे खळबळ माजलीये.

आज या प्रकरणातील आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आलं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे, तर आरोपींना मदत करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबईतून अटक करण्यात आली.

वकिलाच्या दाव्यानं सगळीकडे खळबळ

केज कोर्टानं आरोपीचे वकील आणि पोलिसांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना 18 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

युक्तिवाद सुरू असातना आरोपीच्या वकिलाने कोर्टात खळबळजनक दावा केला आहे. आरोपीच्या वकिलाकडून खळबळजनक दावा करण्यात आला आहे, आका- आका म्हटलं जातय तो आका म्हणजे विष्णू चाटे हाच आहे, तो आधीपासूनच कोठडीत आहे, असा दावा आरोपीच्या वकिलाकडून करण्यात आला.

Santosh Deshmukh | “हत्येचा आजीबात पश्चताप नाही”

आरोपींना संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचा आजीबात पश्चताप नसल्याचं पोलिसांनी कोर्टात म्हटलं होतं.  तर दुसरीकडे  आरोपींना हत्येचा पश्चताप नाही असं म्हणता येणार नाही आरोपींच्या कोठडीसाठी एसआयटीकडे असलेलेले मुद्दे पुरेसे नाहीत. जवळपास या गुन्ह्यातल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. विष्णू चाटे यालाही आधीपासूनच अटक करण्यात आलेली आहे. असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलाकडून करण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या-

सुदर्शन घुले, सुधीर सांगळेचा गेमओव्हर, केज कोर्टात झाला मोठा निर्णय!

सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना पळून जायला पैसे ‘या’ व्यक्तीने पुरवले!

संतोष देशमुखांच्या भावाला मोठा संशय; “आरोपींना आश्रय देणारा हा…”

“यांच्या बापाचा बाप आला तरी आम्ही…”; मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?

सुदर्शन घुले अन् सुधीर सांगळेच्या मागील 10 वर्षाच्या गुन्ह्यांची यादी समोर!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .