मोठी बातमी! सरपंच संतोष देशमुख यांचा मारहाणीचा व्हिडीओ CID च्या हाती???

santosh deshmukh

Santosh Deshmukh | बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटी कडून सुरु आहे. या प्रकरणी सीआयडीला आणि एसआयटीला अत्यंत महत्त्वाचा पुरावा मिळालाय. यामुळे आरोपींच्या अडचणीत आणखी वाढ झालीये.

काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता. त्यात संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांना मारहाण करतानाचे व्हिडीओ आरोपींच्या मोबाईलमध्ये होते. ते व्हिडीओ आरोपींनी मोबाईलमधून डिलीट केले. मात्र हे व्हिडीओ एसआयटींनी रिकव्हर केले आहेत.

महत्वाचा पुरावा हाती?

सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh)  यांना मारहाण करतानाचा व्हिडीओ एसआयटीने मोबाईलमधून डिलीट केलेला. मात्र पोलिसांनी हा डाटा मिळवला आहे. एसआयटीने संतोष देशमुख हत्या प्रकरणातील महत्वाचे पुरावे न्यायालयात सादर केलेत.

संतोष देशमुख यांना मारताना जो लाकडी दांडका वापरला आहे, तो न्यायालयात सादर केला आहे. मारहाणीत वापरलेले तलवारीसारखे शस्त्र आहेत. तसेच लोखंडी रॉड आणि कोयता एसआयटीने न्यायालयात सादर केला आहे.

वापरलेली शस्त्रं जप्त-

वाल्मिक कराड फरार होताना आणि शरण येताना वापरलेली स्कॉर्पिओ गाडी जप्त केली आहे, अशी माहिती सीआयडीच्या तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात दिली आहे. सुदर्शन घुले आणि विष्णु चाटे यांची समोरासमोर चौकशी करणे आवश्यक आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. सरकारी वकिलांनी विष्णू चाटेच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे.

या व्हिडिओसह सीआयडीच्या पथकांनी अनेक शस्त्रं जी मारहाण करताना वापरली ती जप्त केली आहेत. त्यात 41 इंचाचा गॅस पाईप, लोखंडी रॉड, पाच वायर, लाकडी दांडा, तलवारीसारखे शस्त्र, एक कोयता, एक लोखंडी फायटर असे पोलिसांनी जप्त केल्याचे माहिती मिळत आहे.

News Ttile : santosh deshmukh murder video found by CID

महत्त्वाच्या बातम्या-

मुंडे भाऊ-बहिणीविरोधात मराठा समाज आक्रमक, दोघांच्याही राजीनाम्याची केली मागणी

 

 

HMPV व्हायरसमुळे मृत्यू ओढावू शकतो का?; मोठी माहिती समोर

वाल्मिक कराडकडे कोट्यवधींची संपत्ती, आकडा पाहून अधिकारीही थक्क

पंकजा मुंडेंना कोणी पाडलं? सुरेश धस यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

राज्यात पुन्हा होम क्वारंटाईन, आयसोलेशन वॉर्ड?; धक्कादायक बातमी समोर

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .