Top News पुणे फोटो फिचर

“थोरातांना टिळक वाड्यात बसून छत्रपती संभाजीराजांचा इतिहास कळणार नाही”

पुणे | औरंगाबादच्या नामंतराला राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीमधील काँग्रेस पक्षाने जाहीरपणे आपला विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदेनी संतोष शिंदे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांवर निशाणा साधला आहे.

बाळासाहेब थोरातांना टिळक वाड्यात बसून छत्रपती संभाजीराजांचा इतिहास कळणार नाही आणि पचणारही नाही. आमचा वारसा आम्हाला गौरवपूर्ण चालवू द्या, असं संतोष शिंदे यांनी म्हटलं आहे. पुण्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी पुण्याचं नाव बदलण्याचीही मागणी केली.

पुणे शहर हे माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक आहे. त्यामुळे नामांतराचं राजकारण करू नका. इतिहासातील प्रतिकांचा आदर करायला शिका, असं संतोष शिंदे म्हणाले.

दरम्यान, औरंगाबादच्या नामंतरावरून राज्यातील राजकीय वातावरण पेटलं आहे. विरोधी पक्ष भाजप आणि मनसेनेही औरंबादचं नाव बदलण्याची मागणी केली आहे. त्यामुळे शिवसेना मोठ्या पेचात अडकली आहे.

थोडक्यात बातम्या-

औरंगाबादच्या नामंतरावरून ठाकरे सरकारमधील विरोधाभासावर अजित पवाराचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

“औरंगाबादच्या नामांतराच्या वादातून ठाकरे सरकार कोसळणार”

‘मी ‘त्या’ पैशातून तीन कोटी 75 लाखांचं नवीन कार्यालय विकत घेतलं’; मातोंडकरांनी केला खुलासा

“ओबीसीला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या”

“मंत्रालयात न जाणाऱ्या घरकोंबड्यांसाठी सरकारने काही नियमावली जाहीर केली आहे का?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या