‘गोष्ट गावाकडची… संत्या सुरकीच्या प्रेमाची’; प्रतिक्षा लागून राहिलेल्या ‘संतुर्की’चा ट्रेलर प्रदर्शित
पुणे | महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेली सुप्रसिद्ध मराठी वेबसिरीज ‘गावाकडच्या गोष्टी’ ने एक नवं वळण घेतलं आहे, वेबसिरीजचे दोन पर्व जरी संपले असले तरी हा पूर्णविराम नाही… ‘कोरी पाटी’ प्रोडक्शनच्या ‘गावाकडच्या गोष्टी’मधील लोकप्रिय जोडी ‘संत्या-सुरकी’ यांची प्रेमकथा आपल्याला नितीन पवार दिग्दर्शित ‘संतुर्की’ या वेबसिनेमाद्वारे पाहता येणार आहे.
‘संतुर्की’ या वेबसिनेमाचा ट्रेलर कोरी पाटी प्रोडक्शन्स या युट्युब चॅनेलवर प्रदर्शित झाला आहे. त्या ट्रेलरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय.
साधी आणि सर्वांना आपलीच वाटावी अशी कहाणी असलेली ‘गावाकडच्या गोष्टी’ या वेबसिरीजचे दोन यशस्वी पर्व झाले. सातारा जिल्ह्यातील केळेेवाडी गावात जन्मलेल्या वेबसिरीजला जगभरातून प्रेम मिळालं. या वेबसिरीजमध्ये “संत्या आणि सुरकी” हे पात्र सर्वाधिक लोकप्रिय झालं.
दोघांच एकमेकांवर जीवापाड प्रेम असूनही काही कारणास्त्व त्याचं लग्न होऊ शकल नाही… लग्न होऊन गेलेली सुरकी पुन्हा संतोष समोर येते तेव्हा त्याची होणारी तगमग… किंवा तिच्या मुलाने “मामा” म्हटल्यावर होणारी गम्मत सगळ्यांना भावली पण याच सोबत सगळ्यांना वेध लागले की इतक जीवापाड प्रेम करणारी हे दोघं एकमेकांपासून वेगळी का झाली…? याचचं उत्तर या कोरी पाटी प्रोडक्शनच्या ‘संतुर्की’ चित्रपटात आहे.
महत्वाच्या बातम्या
-खासदार धैर्यशील माने आशीर्वादासाठी पोहोचले थेट राजू शेट्टींच्या घरी
-“राममंदिराबाबत न्यायालयाने पुरावे चिवडीत बसू नये; जनादेश मानायला हवा”
-भाजपात जाण्याच्या चर्चांवर विश्वजीत कदम म्हणतात…
-लोकसभेचा निकाल म्हणजे जनतेने राम मंदिराच्या बाजूने दिलेला कौल- उद्धव ठाकरे
-काँग्रेसला मोठं खिंडार पडणार?? हे दोन नेते भाजपच्या वाटेवर??
Comments are closed.