बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सपना चौधरीच्या ‘या’ गाण्याने रचला नवा इतिहास, 47 कोटीच्या वर हिट्स

मुंबई |  अभिनेत्री आणि डान्सर सपना चौधरीचा एक डान्स व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय. या व्हीडिओमध्ये ‘तेरे आँखो का ये काजल’ या गाण्यावर तिने धमाकेदार परफॉर्मन्स दिला आहे.

सोनोटेक कंपनीच्या युट्युब चॅनेलवर तिने हा व्हीडिओ प्रकाशित केला आहे. भोजपुरी, पंजाबी आणि हरियाणवी चित्रपटांमध्ये धमाल करणाऱ्या सपनाचा हा व्हीडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलेला दिसून येत आहे. आतापर्यंत या व्हीडिओला 47 कोटींच्या वर हिट्स आलेल्या आहेत.

सपनाचा हा व्हीडिओ आतापर्यंतचा सर्वांत जास्त पाहिला गेलेला व्हीडिओ आहे. यावरूनच तिच्या लोकप्रियतेचा अंदाज लागू शकतो. या व्हीडिओमध्ये सपनाने दिलखेचक डान्स स्टेप केल्या आहेत.

सपना चौधरीने आपल्या करिअरची सुरूवात एका ऑर्केस्ट्रामधून केली होती. मात्र आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर तिने भोजपुरी आणि हरियाणवी चित्रपटांमध्ये आपलं स्थान बळकट केलं आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या

‘मला पण योगदान देऊ द्या’; पंतप्रधान मोदींच्या पॅकेजवर मल्ल्याचं ट्वीट

बिनविरोध आमदार म्हणून निवडून आल्यानंतर शशिकांत शिंदे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन

महत्वाच्या बातम्या-

…तर माझा भरोसा धरू नका; एकनाथ खडसेंचा भाजपला इशारा

अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला भरीव पॅकेज द्या; शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र

बिल गेट्स यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार, कारण…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More