Sara Ali Khan | बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंह याने काही वर्षांपुर्वी आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाची चौकशीही करण्यात आली. सुशांतचा मृत्यू होऊन आता जवळपास 4 वर्षे झाली आहेत. त्याने 14 जूनरोजी मुंबईतील राहत्या घरात गळफास घेतला होता. अशात सुशांत हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्याबद्दल बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीने (Sara Ali Khan) एक धक्कादायक खुलासा केला आहे.
अभिनेता सैफ अली खानची लाडकी लेट तथा अभिनेत्री सारा अली खान हीने सुशांतबद्दल एक खुलासा केला आहे. सारा अली खान हिने अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली होती. दोघांनी ‘केदारनाथ’ या सिनेमात एकत्र काम केलं आहे. या सिनेमानंतर देखील दोघे बऱ्याच ठिकाणी एकत्र दिसायचे.
सारा अली खानचा खळबळजनक खुलासा
शिवाय दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी देखील जोर धरला होता. मात्र, सुशांतच्या निधनानंतर सर्वांना खूप मोठा धक्का बसला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर एनसीबीने सारा अली खान(Sara Ali Khan) हिला चौकशीसाठी बोलावलं होतं. तेव्हा अभिनेत्रीने मोठा खुलासा केला होता.
काही मीडिया रिपोर्टनुसार, सारा हिने सुशांतला डेट करत असल्याचं सांगितलं होतं. पण, नंतर त्यांचा ब्रेकअप झाला होता. यावेळी साराने ब्रेकअपचं कारण देखील सांगितलं होतं. साराने सुशांत कधीच निष्ठावंत नव्हता, असं सांगितलं होतं.
View this post on Instagram
सारा आणि सुशांत एकमेकांना करायचे डेट?
सारा (Sara Ali Khan) म्हणाली होती की, “सुशांत खूप जास्त पजेसिव्ह होता. माझ्या आगामी सिनेमात सुशांतला कास्ट करा… असं दिग्दर्शकांना जाऊन सांग. असं तो सतत म्हणायचा.” यावेळी साराने सिनेमाच्या शुटिंग दरम्यान मी सिगारेट ओढली होती, अशी कबुली देखील दिली होती.
दरम्यान, सुशांतचा लोणावळा येथे एक फार्महाऊस आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर फार्महाऊसच्या केअरटेकरने चौकशी दरम्यान मोठी माहिती दिली होती. काही रिपोर्टनुसार, सुशांत 2019 मध्ये सारा हिला प्रपोज देखील करणार होता, अशी माहिती केअरटेकरने दिली होती. इतकंच नाही तर, सुशांत साराला मोठं गिफ्ट देखील देणार होता. 2018 पासून सारा कायम फार्महाऊसवर यायची. पण 2019 नंतर सारा कधीच आली नाही. सुशांत जेव्हा सारा हिच्यासोबत फार्महाऊसवर यायचा तेव्हा दोघे 3 – 4 दिवस एकत्र राहायचे, अशी माहिती केअरटेकरने दिली होती.
News Title : Sara Ali Khan Big reveal about sushant singh
महत्त्वाच्या बातम्या-
“तुझी माफी मागण्याची लायकी नाही, तुला..”; भाजपमध्ये गेलेल्या अभिनेत्याची पोस्ट
भारताला सर्वात मोठा धक्का; विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र
खुशखबर! सोनं झालं स्वस्त, चांदीचाही मोठा दिलासा
पुढील काही दिवस राज्यात अशाप्रकारे असणार हवामान?
‘मोदी तेरी कब्र खुदेगी’च्या घोषणा देऊन..; कंगनाकडून विनेश फोगटला उपरोधिक शुभेच्छा