बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सारा अली खानच्या ड्रायव्हरला कोरोनाची लागण, तिचा रिपोर्ट आला….

मुंबई |  कोरोनाचं जगभरात थैमान सुरू असताना आता बॉलिवूडमध्ये देखील कोरोनाने एन्ट्री घेतली आहे. बच्चन आणि खेर यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अशातच अभिनेत्री सारा अली खानच्या वाहन चालकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्याला कॉरन्टाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

सारा अली खानच्या वाहन चालकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी कोरोना चाचणी करून घेतली आहे. सुदैवाने या सगळ्यांचे अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत. इन्स्टाग्राम पोस्ट करत तिने ही माहिती आहे.

“माझं कुटुंब, घरातील स्टाफ आणि माझी कोरोना चाचणी केलीये. आमच्या सगळ्यांचे करोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तरीदेखील आम्ही काळजी घेत आहोत. माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून बीएमसीचे मनापासून धन्यवाद. त्यांनी आम्हाला लगोलग मदत केली आणि यातून बाहेर पडण्याचा रस्ता दाखवला. सगळ्यांनी काळजी घ्या”, असं साराने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, चार दिवासंपूर्वी अभिनेता अभिषेच बच्चन, शहेनशाह अमिताभ बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या बच्चन तसंच ऐश्वर्याची मुलगी आराध्या बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या कार चालकाला देखील कोरोनाची लागण झाली आहे.

 

 

View this post on Instagram

 

🙏🏻🙏🏻🙏🏻

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

 

ट्रेंडिंग बातम्या-

चिंताजनक! पुण्यात एकाच दिवसात 832 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

आयसीसच्या संपर्कात असलेल्या तरुणीचं बारामती कनेक्शन; पुण्यातून अटक

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांत जाऊन आज एक महिना पूर्ण… अंकिता लोखंडेची बोलकी इन्स्टाग्राम पोस्ट!

देशात कोरोनाबाधितांच्या संख्येने 9 लाखांचा टप्पा ओलांडला, गेल्या 24 तासांत तब्बल इतक्या जणांना लागण

बकरी ईदला कुर्बानीसाठी सूट द्या, नसीम खान यांची उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More