बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सचिनच्या लेकीचा फोटो, अभिनेत्याचा एक लाईक अन् नव्या चर्चांना उधाण

मुंबई | भारताचा स्टार क्रिकेटपटू आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची एकुलती एक कन्या सारा तेंडूलकर सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. तिने अलिकडेच सोशल मीडियावर एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोसोबत सध्या बॉलिवुडमधील एका अभिनेत्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सारा तेंडूलकरने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो अपलोड केला आहे. अपलोड करण्यात आलेल्या फोटोत ती बाल्कनीत उभी असल्याचं दिसत आहे. हा तिचा फोटो अनेक चाहत्यांबरोबर बॉलिवूडचा अभिनेता कार्तिक आर्यनच्या देखील पसंतीस पडला असून कार्तिकने त्या फोटोला लाईक देखील केलं आहे.  त्यामुळे सारा आणि कार्तिक या दोघांविषयी सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.

भारताचा क्रिकेटपटू आणि सध्या आयपीएलमध्ये कोलकाता संघातील खेळाडू शुभमन गिलसोबतही सारा तेंडूलकरचं अफेअर सुरू असल्याची अफवा पसरली होती. मात्र दोघांनी या चर्चेवर अद्याप बोलणं पसंत केलेलं नाही. यासोबत मुकेश अंबानींचा मुलगा अनंतसोबत देखील तीचं नाव जोडलं गेलं होतं. मात्र आता फक्त फोटो लाईक केल्यामुळे सारा आणि कार्तिकबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगलेली पहायला मिळत आहे.

दरम्यान, सारा तेंडूलकर दिसायला खुपच सुंदर आहे. चेहऱ्यावरील तिच्या स्मितहास्यमुळे तिचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसते. त्यामुळे तिचे इन्स्टाग्रामवर तब्बल 14 लाख फॉलोअर्स आहेत. सारा सध्या लंडनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे. तिचे शालेय शिक्षण मुंबईमध्येच झाले आहे.

थोडक्यात बातम्या-

“…असं यापूर्वी कधीच घडलं नव्हतं”; शरद पवार भाजपवर संतापले

‘मोदी लखीमपूर हिंसाचारावार बोलत का नाहीत?’, निर्मला सीतारमन म्हणतात…

“पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचा महापौर असावा ही जनतेची इच्छा”

रात्री 11.30 ते सकाळी 6 व्हॉट्सअप बंद राहणार?; पीआयबीकडून मोठं स्पष्टीकरण

“मी चार वेळा मुख्यमंत्री होतो पण, मला कधी फडणवीसांसारखं वाटलं नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More