सारा तेंडुलकरच्या नावे पवारांविषयी आक्षेपार्ह ट्विट करणारा अटकेत

मुंबई | क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी साराच्या नावाने बनावट ट्विटर अकाऊंट बनवून शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केलीय. नितीन आत्माराम सिसोदे (वय 39) असं या व्यक्तीचं नाव आहे. 

आयएमईआय क्रमांक आणि आयपीअॅड्रेस याद्वारे पोलिसांनी नितीनचा शोध लावला. त्यानंतर अंधेरीच्या लोकसरिता अपार्टमेंटमधून त्याला अटक करण्यात आली. सचिनच्या सचिवाने यासंदर्भात तक्रार दिली होती.

दरम्यान, अटक केल्यानंतर नितीनला किल्ला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने त्याला 9 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.