बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माझ्या औषधाला परवानगी द्या, कोरोना झटक्यात बरा करतो”

पुणे | पुण्यातील एका डॉक्टरांनी कोरोनावर आयुर्वेदिक औषध शोधल्याचा दावा केला आहे. इतकंच नाही तर हे औषध कोरोनावर 100 टक्के रामबाण उपाय असल्याचा दावा कोथरुड येथील डॉ. सारंग फडके यांनी केला आहे. आतापर्यंत 100 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांना हे औषध दिलं असून, ते 100 टक्के कोरोनामुक्त झाल्याचा दावा डॉ. फडके यांनी केला आहे.

डॉ. फडके यांनी गेल्या वर्षीपासून आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना हे औषध देत असून, हे रुग्ण बरे झाल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी या औषधाबाबत आयुष मंत्रालयाशी संपर्क साधून, या औषधाची दखल घेण्याची विनंती केली आहे.

हे औषध आयुर्वेदिक असून त्याचे कुठलेही साईड इफेक्ट्स नसल्याचं डॉक्टरांचे म्हणणं आहे. त्यामुळे या औषधाला जर सरकारने मान्यता दिली तर कोरोना रुग्णांचा आकडा आणि मृत्यूदर कमी करण्यास मदत होईल असं डॉ. सारंग फडके यांचं म्हणणं आहे.

1 वर्षांच्या मुलापासून 78 वर्षांच्या पेंशटला हे औषध देण्यात आले आहे. या औषधाला मान्यता मिळावी म्हणून डॉ. फडके हे गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाशी पाठपुरावा करत आहेत. मात्र अद्याप केंद्राने त्यांची दखल घेतली नाही.

थोडक्यात बातम्या- 

“पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोरोनाशी लढतोय, तरीही धीरोदत्तपणे हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय”

“तुम्ही फक्त कपडे बदलून फेसबुक लाईव्ह करायला मुख्यमंत्री झालात का?”

मुलाचं लग्न बघायचं त्यांच्या नशिबातच नव्हतं, 5 दिवस आधीच आई वडिलांना ट्रकनं चिरडलं

“रिषभ पंतला खेळताना पाहिलं की मला माझे सुरुवातीचे दिवस आठवतात”

रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु, पुण्यातील रुग्णालयाची संभाजी ब्रिगेडकडून लाईव्ह पोलखोल

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More