मुंबई | राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मराठवाड्यातील मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षामुळे परळी विधानसभेची लढाई अटीतटीची होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या तोंडावर सारंगी महाजन (Sarangi Mahajan) यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत एकच खळबळ उडवून दिली आहे.
दोन्ही मुंडे बहीण भावाने संगनमताने धाक दाखवून आणि कारस्थान रचून जबरदस्तीने कोट्यवधी रुपयांची जमीन अल्प किमतीत खरेदी केली असल्याचा आरोप सारंगी महाजन (Sarangi Mahajan) यांनी केला.
प्रवीण महाजनांच्या पत्नीचा गंभीर आरोप
प्रवीण महाजन यांच्या नावे असलेली बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामधील मौजे जिरेवाडी येथील गट नंबर 240 मधील करोडो रुपये किमतीची 36.50 आर जमीन धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी जबरदस्तीने घेतली असल्याच त्यांनी म्हटलं आहे.
परळीत माझी 63.50 आर जमीन होती, 36 आर जमीन फ्रॉड करुन विकली. मला परळीच्या अनुसूया हॉटेलमध्ये बोलावून घेतले. मला तिथून रजिस्ट्रार ऑफिसला नेले. तिकडे माझ्याकडून सही करुन घेण्यात आली, असा आरोप सारंगी महाजन (Sarangi Mahajan) यांनी केलाय.
कोणी जमीन घेतली, हे आम्हाला माहिती नाही. तिकडून आम्हाला गोविंद बालाजी मुंडेने घरी नेले, जेवू घातले. त्यानंतर ब्लँक पेपरवर सह्या घेतल्या. त्याला मी विरोध केला असता त्याने म्हटले की, सही केल्याशिवाय धनुभाऊ तुम्हाला परळी सोडून देणार नाहीत, अशी धमकी दिल्याचे सारंगी महाजन यांनी सांगितलं.
सारंगी महाजन कोण आहेत?
सारंगी महाजन या प्रमोद महाजन यांचा भाऊ प्रवीण महाजन यांच्या पत्नी आहेत. प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजनांवर गोळी चालवली. ठाण्याच्या तुरुंगात प्रमोद महाजन यांच्या हत्येप्रकरणी प्रवीण महाजन शिक्षा भोगत होते त्यांचा 2015 मध्ये मृत्यू झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘ज्यांची घरं बुलडोझरने पाडली त्यांना…’; सुप्रीम कोर्टाचा योगी सरकारला मोठा झटका
“मी आमदार झालो तर पोरांचे लग्न करुन देणार”,’या’ उमेदवाराचं अजब आश्वासन
“फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते..”; राऊत संतापले
महाविकास आघाडीने जनतेला दिली पाच प्रमुख आश्वासनं? वाचा सविस्तर
शरद पवारांवर केलेल्या वक्तव्याबद्दल सदाभाऊ खोत यांची जाहीर माफी; म्हणाले..