बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सैराट फ्रेम तानाजीनं केलं न्यूड फोटोशूट; सोशल मीडियावर तुफान चर्चा

मुंबई | सैराट चित्रपटानं मराठी प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवलं. सैराटच्या कलाकारांना महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर चित्रपटातील प्रसिद्ध कलाकारांनी दुसऱ्या चित्रपटात काम केलं. त्यातील काही चित्रपट गाजले तर काही चित्रपट फ्लाॅप झाले. पण या कलाकारांना सोशल मीडियावर चांगली प्रसिद्धी मिळते आहे. त्यात आता सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेला लंगड्या म्हणजेच तानाजी गालगुंडे आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

चित्रपटात आपल्या दमदार अभिनयानं फेमस असणारा तानाजी सध्या आपल्या एका न्यूड फोटोशूट मुळे चर्चेत आहे. तानाजीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो न्युड उभा आहे. तर त्याच्या दोन्ही हातात गिटार आहे. तर यात तो खळखुळ हसताना देखील दिसत आहे. रावण फिचरच्या पेजने हा फोटो शेअर केला आहे.

माझे पाय तर योग्य रचनेत नाहीयेत, पण माझं संगीत आहे…! मी माझ्या स्वतःच्या रचना करण्यात चांगला आहे… कारण मी मी आहे.!, असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे. काही दिवसांपुर्वी विनिता खरात या अभिनेत्रीने अशाच प्रकारचा फोटोशूट केला होता. त्यानंतर विनिता खरात सोशल मीडियावर ट्रोल झाली होती. विनिता खरातने प्रसिद्ध कबीर सिंग या चित्रपटात काम केलं होतं.

दरम्यान, आपण सर्व शरिराने अपंगत्व असणाऱ्या किंवा शारिरीकदृष्ट्या असंतुलित असणाऱ्या लोकांची खिल्ली उडवत असतो. शारिरिक सकारात्मकता सांगण्याचा प्रयत्न या फोटोमधून करण्यात आला आहे. स्वतःच्या शरिरातील स्वतःबद्दल असलेली नकारात्मकता मारून स्वतःला कमी समजू नये असा या फोटोमधून उपदेश देण्यात येत आहेत. या सिरीजमध्ये आतापर्यंत तानाजी गालगुंडे ,विनिता खरात, ऋतुजा पवार, सोनाली नाडकर, अलिझेन खान यांनी फोटोशुट केले आहेत.

पाहा फोटो-

 

थोडक्यात बातम्या-

“भाजपमधून बाहेर पडा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करायला तयार आहोत”

‘दोन्ही डोसमुळे मृत्यूचा धोका 98 टक्क्यांपर्यंत कमी, तर एक डोसमधून…’; केंद्र सरकारची माहिती

धक्कादायक! कल्याणमधील कोळसेवाडीत दोन तरुण आणि एका तरुणीला जमावाकडून बेदम मारहाण

…मग पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही ईडी चौकशी व्हावी – नाना पटोले

‘उद्धव ठाकरे- अजित पवार आता तयार रहा…’; आचार्य तुषार भोसले भडकले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More