औरंगाबाद | गांधी हत्येसाठी विखारी वातावरण तयार केल्याचा ठपका ठेवत 4 फेब्रुवारी 1948 रोजी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली.
या घटनेला 70 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त या घटनेची औरंगाबादमधील तरुणांनी उजळणी केली. तरुणांना या इतिहासाची माहिती व्हावी याकरता युथ फॉर डेमोक्रसी आणि निर्धार सोशल फाउंडेशनच्या वतीने ‘सांस्कृतिक दहशतवाद’ दिनाचे आयोजन करण्यात आले होते. क्रांती चौकात हा कार्यक्रम पार पडतोय.
हिंदू महासभेच्या नेत्यांनी गांधी स्मृतिदिनानिमित्त केलेल्या कृत्याचा यावेळी निषेध करण्यात आला. राष्ट्रपित्याचा अवमान करण्याऱ्या विकृतांना देशद्रोहाच्या कलमाखाली अटक करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील तरुणांनी देशाच्या सद्यस्थितीवर चर्चा केली. प्रतीक पाटील, अक्षय पाटील, अॅड. संदीप पाटील, मयूर सोनवणे, राजेश मुंडे, अमोल दांगट, अक्षर जेवरीकर, हृषिकेश कांबळे, गुरुदत्त राजपूत, डॉ.दिलीप चव्हाण यावेळी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
–मी जगातील सर्वात अभिमानी पती- रणवीर सिंग
–मुख्यमंत्र्यांना ट्रेंडिंगमध्ये आणण्यासाठी आलेल्या काजल, रिया, श्रेया, भावना ट्रोल
–नरेंद्र मोदींनी लोकशाहीची थट्टा चालवलीय- अरविंद केजरीवाल
–मोदींच्या प्रेमापोटी केलं होतं लग्न; आता मात्र तिचं-त्याचं जमेना!
–अण्णांमुळेच नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल सत्तेवर – राज ठाकरे