धोनीची स्टाईल मारायला गेला आणि हसू करुन घेतलं!

मुंबई | भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची स्टाईल मारणं पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदला चांगलंच महागात पडलं. तो बाद तर झालाच शिवाय त्याचं हसूही झालं.

गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात धोनीने पाय स्ट्रेच करुन स्वतःला स्टम्पिंग होण्यापासून वाचवलं होतं. तेव्हा त्याच्या लवचिकतेचं कौतुकही झालं होतं. 

सोमवारी पाकिस्तानचा न्यूझीलंडविरुद्धच टी-20 सामना होता. या सामन्यात सरफराज संघाचा ढासळलेला डाव सावरण्याचा प्रयत्न करत होता. मिशेल सँटनरच्या चेंडूवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात तो फसला मग त्यानंही धोनीप्रमाणे पाय स्ट्रेच केले, मात्र त्या प्रयत्नात तो मैदानावरच कोसळला. आता धोनीची स्टाईल मारली म्हणून तो सोशल मीडियावर ट्रोल होतोय.