बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदी पेट्रोलच्या किंमती कमी करण्यासाठी नाहीतर भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी आलेत- भाजप

नवी दिल्ली | वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरुन भाजपच्या प्रवक्त्यांनी एक अजब वक्तव्य केलं आहे. दिल्ली भाजप प्रवक्त्या सारिका जैन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक व्हिडिओ पोस्ट केलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कांदा, टोमॅटो आणि पेट्रोलच्या किंमती कमी करण्यासाठी नव्हे तर भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी आले असल्याचं भाजप प्रवक्त्या सारिका जैन यांनी म्हटलं आहे.

ज्यांना असे वाटते की पंतप्रधान मोदी कांदा, टोमॅटो, कांदे आणि पेट्रोलचे दर कमी करण्यासाठी आले आहेत त्यांनी दूर राहावं. कारण मोदी अनेक एम्स रुग्णालये बांधण्यासाठी, दहशतवाद संपवण्यासाठी, प्रत्येक घरात शौचालय बांधण्यासाठी, प्रत्येक घरात स्वयंपाकासाठी गॅस कनेक्शन देण्यासाठी आणि विकास करण्यासाठी आले आहेत, असं जैन यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी आले आहेत. ते अयोध्येत राम मंदिर तयार करण्यासाठी, लाखो खेड्यांना वीजपुरवठा करण्यासाठी, थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी आणि मुस्लिम बहिणींना तिहेरी तलाकातून मुक्त करण्यासाठी आले आहेत, असंही सारिका जैन यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी विरोधकांमध्ये धक्काबुक्की; कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब

“भागवतांनी हिंदू- मुस्लीम ऐक्यावर बोलणं म्हणजे RSSने सरड्याप्रमाणे रंग बदलणं”

‘सगळं कामकाज बाजूला ठेवा पण MPSC वर चर्चा घ्या’; फडणवीस आक्रमक

“170 आमदार असून काय उपयोग?, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा राहुल गांधी बरे”

“ओबीसींच्या इम्पिरीकल डेटाचा ठराव म्हणजे वेळकाढूपणाचं धोरण”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More