मंत्रालयात भरणार सरपंच दरबार, पंकजा मुंडे समस्या ऐकणार!

मंत्रालयात भरणार सरपंच दरबार, पंकजा मुंडे समस्या ऐकणार!

मुंबई | ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरूवारी सरपंच दरबार भरवण्याची घोषणा केलीय. येत्या गुरूवारपासून मंत्रालयाच्या दालनात या अनोख्या उपक्रमाची सुरुवात होणार आहे. 

सरपंच हा ग्रामविकासाचा पाया मजबूत करणारा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पंकजा मुंडे स्वतः समस्या समजावून घेणार आहेत. तसेच त्या समस्या सोेडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. 

पहिला सरपंच दरबार येत्या 7 डिसेंबरला सकाळी 11.30 वाजता मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरील दालनात होणार आहे. यावेळी सरपंचांनी आपल्या गावातील समस्यांचं निवेदन सोबत आणावं, असं आवाहन ग्रामविकास मंत्रालयाकडून करण्यात आलंय. 

Google+ Linkedin