महाराष्ट्रातील महिला सरपंचाला ‘विशेष अतिथी’ म्हणून निमंत्रण!

Sarpanch from Maharashtra to attend Republic Day 2025 parade in Delhi as special guest

Republic Day 2025 | प्रजासत्ताक दिन म्हणजे २६ जानेवारी (Republic Day 2025) रोजी राजधानी दिल्ली (Delhi) येथे राष्ट्रपती (President), पंतप्रधान (Prime Minister) यांच्या उपस्थितीत होणाऱ्या परेडला (Parade) उपस्थित राहण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, हे सर्वांनाच शक्य होत नाही. आता या परेडला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा मोठा बहुमान राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एका सरपंचाला मिळणार आहे. हा बहुमान यंदा कोकणातील (Konkan) रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत (Gram Panchayat) पोमेंडी बुद्रुक कारवांचीवाडीच्या महिला सरपंच ममता जोशी यांना मिळाला आहे.

केंद्र (Central Government) व राज्य शासनाच्या (State Government) योजनांची (Schemes) प्रभावी अंमलबजावणी

केंद्र शासनाकडून व राज्य शासनाकडून ग्रामीण पातळीवर (Rural Level) राबवण्यासाठी असलेल्या योजना व या योजनांची अंमलबजावणी (Implementation), योजनांमध्ये असलेला लोकसहभाग (Public Participation), त्यासाठी केलेले प्रयत्न आदी निकष (Criteria) निश्चित करण्यात आले होते. केंद्र व राज्य शासनाच्या लोकाभिमुख (People Oriented) योजना जनतेपर्यंत (People) पोहोचवणाऱ्या जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींची निवड या उपक्रमासाठी (Initiative) करण्यात आली होती. त्यांच्याकडून यासाठी माहिती मागविण्यात आली होती. (Republic Day 2025)

पोमेंडी बुद्रुक कारवांचीवाडी ग्रामपंचायतीची (Gram Panchayat) निवड

या ग्रामपंचायतींमधून जिल्ह्यातील पोमेंडी बुद्रुक कारवांचीवाडी या एकमेव ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान घरकुल योजना (PM Awas Yojana), उज्वला गॅस योजना (Ujjwala Gas Yojana), राज्य शासनाची रमाई घरकुल योजना (Ramai Gharkul Yojana), लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) आदी विविध प्रकारच्या योजना, उपक्रम गावात पूर्ण क्षमतेने राबवून त्याचा लाभ नागरिकांना (Citizens) देण्यात आला आहे. त्यामुळेच या ग्रामपंचायतीला हा बहुमान मिळाला आहे. (Republic Day 2025)

Title : Sarpanch from Maharashtra to attend Republic Day 2025 parade in Delhi as special guest

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .