राजकोट | तिसऱ्या अपत्यामुळे सरपंचपद धोक्यात आलेल्या महिलेला आता सरपंचपद वाचवण्यासाठी डीएनए चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील ही अजब घटना आहे.
गेल्या 29 डिसेंबर रोजी तोरी गावच्या सरपंचपदी ज्योती राठोड यांची निवड झाली होती. पण त्यांना 3 अपत्य असल्याचा दावा बाला राठोड यांनी केला आहे. तर तिसरं अपत्य आपलं नसल्याचं सरपंच महिलेचं म्हणणं आहे.
बाला राठोड यांच्या तक्रारीनंतर सरपंचांचं निलंबन करण्यात आलं होतं. मात्र त्याला आव्हान दिल्यानं जिल्हा विकास अधिकाऱ्यांनी डीएनए चाचणी करुन हे अपत्य आपलं नसल्याचं सिद्ध करण्यास संरपंचांना सांगितलं आहे.
Comments are closed.