बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या गाडीसमोर गाय आल्याने अपघात; भागवत सुखरूप

चंद्रपूर | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत अपघातातून बालंबाल बचावले आहेत. वरोऱ्यात हा अपघात झाला आहे. मोहन भागवत हे सुखरूप असून त्यांना कुठलीही इजा नसल्याचं कळतंय.

मोहन भागवत यांच्या गाडीसमोर अचानक गाय आल्यामुळे वरोऱ्यात हा अपघात झाल्याचं कळतंय. या अपघातामध्ये त्यांचा सुरक्षा जखमी झाला आहे.

चंद्रपूरवरून नागपूरकडे जात असताना त्याच्या ताफ्यातल्या पहिल्या वाहनाला अपघात झाला. नंदुरी गावाजवळ एका गायीला धडक दिल्यानं हा अपघात घडल्याचं प्रत्यक्षदर्शीचं म्हणणं आहे. या घटनेत सुरक्षा ताफ्यातला जवान जखमी झाला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज जवानाला सुरक्षित उपचारासाठी रुग्णालयात पाठवेपर्यंत स्वतः मोहन भागवत तिथे थांबले होते. यादरम्यान मोहन भागवत यांना सुखरूप नागपूरला पोहोचवण्यात आलं असून जखमी जवानाला वरोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-नाना पाटेकर-तनुश्री दत्ता प्रकरण नव्या वळणावर; आता तनुश्री म्हणते…

-बोफोर्स प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यासाठीची याचिका अखेर CBI कडून मागे

-मराठा आरक्षणाच्या मुद्यावर वैद्यकीय प्रवेशासंदर्भात सरकार उद्या अध्यादेश काढणार

-शरद पवारांनंतर कन्या सुप्रिया सुळेही दुष्काळ दौऱ्यावर

-चाहत्यांचे प्रेम पाहून वॉट्सन भावूक; दिला ‘हा’ खास संदेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More