बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट; ‘सरसेनापती हंबीरराव’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर

मुंबई | अभिनेते प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर रिलिज होताच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि त्यांच्या कारकिर्दीमधील स्वराज्यातील घडामोडी या चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहेत. प्रवीण तरडे हे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची मुख्य भूमिका साकारणार असून तगड्या कलाकारांची फौज या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

अभिनेता गश्मीर महाजनी छत्रपती शंभूराजेंच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, राकेश बापट, उपेंद्र लिमये, स्नेहल तरडे हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चाहते उत्सुकतेने या चित्रपटाची वाट बघत आहेत.

दरम्यान, प्रवीण तरडे दिग्दर्शित टसरनेतापती हंबीररावट 27 मे 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत असून परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट या डायलॉगनला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. उत्तम कलाकार, जबरदस्त अॅक्शन सिन्स आणि दमदार डायलॉगला अप्रतिम म्युझिकची जोड असणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

‘उद्धव ठाकरे म्हणजे…’; नवनीत राणांच्या वक्तव्याने खळबळ

“बूस्टर डोस नाही पण आमचा प्युअर मास्टर ब्लास्टर डोस असतो”

“उद्धवजी, हिंमत करा आणि टोमण्या पलीकडची कृती आज कराच”

कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा वाढल्या, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलच्या दरावर काय परिणाम झाले

मोठी बातमी! केतकी चितळेच्या अडचणी वाढल्या, शरद पवारांवरील टीका अंगलट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More