Top News आरोग्य कोरोना नागपूर

नागपुरात 2 दिवसांचा जनता कर्फ्यू; अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद

नागपूर | राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय. नागपूरमध्ये देखील कोरोनाची स्थिती अजून नियंत्रणात आलेली नाहीये. याच पार्श्वभूमीवर नागपूरात जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आज महापालिकेची बैठक पार पाडली. या बैठकीत महापौर संदीप जोशी तसंच मनपा आयुक्त राधाकृष्णन बी उपस्थित होते. बैठकीनंतर माहिती देताना महापौर म्हणाले, शनिवार आणि रविवार अशा दोन दिवशी जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या दोन आठवड्यांसाठी हा कर्फ्यू असणार आहे.

महापौर संदीप जोशी पुढे म्हणाले, “महापालिकेच्या बैठकीत लॉकडाऊन संदर्भात चर्चा करण्यात आली. लॉकडाऊन जाहीर करावा अशी अनेक लोकप्रतिनिधींची मागणी होती. मात्र लॉकडाऊन लावल्यास अडचणी येतील असं आयुक्तांचं मत होतं. शिवाय लॉकडाऊन बाबत निर्णय घेणं राज्य सरकारचा अधिकार आहे.”

“एकंदरीत चर्चा करून दोन आठवडे शनिवार आणि रविवार जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला. शनिवारी रात्री ते सोमवारी सकाळी साडेसात वाजेपर्यंत हा कर्फ्यू असणार आहे. बाकीचे निर्णय पुढील बैठकीत घेण्यात येतील,” असंही महापौरांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या-

राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मला सुशांतच्या नावाचा गैरवापर करुन मिळणारी प्रसिद्धी नकोय- निया शर्मा

‘मराठा आरक्षणाच्या लढ्याचं नेतृत्व संभाजीराजेंनी करावं’; ‘या’ शिवसेना खासदाराची मागणी

दिलदार माणूस! कोरोनाच्या काळातही रतन टाटांनी कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केला कोट्यवधींचा बोनस

…तर एटीएममधून पैसे काढताना ओटीपीची आवश्यकता, SBI चा नवा नियम

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या