महाराष्ट्र सातारा

स्वातंत्र्यदिनाला गालबोट; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतलं अन्…

सातारा | कोरोनाच्या सावटाखालीही देशात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वातंत्र्यदिनाच्या दिवसालाच गालबोट लागलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका दाम्पत्यानं स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पोलिसांच्या प्रसंगावधानानं मोठा अनर्थ टळला आहे.

प्राप्त माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील दत्तात्रय महाराज कळंबे सहकारी बँकेतील अधिकाऱ्यांनी तब्बल 41 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा दावा नलावडे दाम्पत्यांनी केला आहे. या दाम्पत्यानं वेळोवेळी पोलिस स्टेशनात जाऊन तक्रारही नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी या दाम्पत्याची तक्रार दाखल करून घेतली नाही.

जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देऊनही त्यांनी कसलीच कारवाई केली नाही. प्रशासनानं दखल न घेतल्यानं अखेर या दाम्पत्यानं स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

दोघांनी आपापल्या अंगावर पेट्रोलची कॅन ओतली. मात्र समोरील पोलिसांनी प्रसंगावधान राखत या दाम्पत्याच्या हातातील कॅन हिसकावून घेण्यात आली. जिवितहानी टळली असली तरी या घटनेनं शहरात एकच खळबळ माजली आहे.

 महत्वाच्या बातम्या-

…याची भारताला मोठी किंमत मोजावी लागेल- राहुल गांधी

कोरोनाच्या मृत्यूदरात घट; गेल्या 24 तासातील ‘दिलासादायक’ आकडेवारी!

भारतासोबत ‘हे’ चार देशही 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करतात

सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी आपले जवान काय करू शकतात हे त्यांनी लडाखमध्ये दाखवून दिलंय- नरेंद्र मोदी

पंतप्रधानांनी कोरोना लस संदर्भात दिली ‘ही’ सर्वात मोठी ‘गुड न्यूज’

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या