बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याची चिंता वाढली; 895 संशयित कोरोनाबाधितांचे अहवाल पॉझिटिव्ह

सातारा | गेल्या दीड वर्षांपासून संपूर्ण देशभरात कोरोनाचा उद्रेक झाला असतानाच हळूहळू रुग्णसंख्या आटोक्यात आली आणि त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डोकं वर काढलं. महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग नागरिकांना झाला.

हळूहळू महाराष्ट्रातील कोरोना आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळत असतानाच सातारा जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील 895 संशयित कोरोनाबाधित रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ माजली आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार साताऱ्यात एका दिवसात तब्बल 16 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 895 संशयितांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. तसेच प्रशासनाच्या चिंतेतही यामुळे भर पडली आहे.

सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 85 हजार 270 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 01 लाख 73 हजार 080 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तसेच 8549 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि आतापर्यंत 4182 जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती सातारा जिल्ह्याचे शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या –

‘घरातून एवढं काम होतंय, बाहेर पडलो तर…’; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला

“बोगस लसीकरण करणाऱ्यांना जन्मठेप द्या”; ‘या’ मुख्यमंत्र्यांची महत्वाची मागणी

काय सांगता! पाण्याच्या टंचाईमुळे महाराष्ट्रातील ‘या’ कुटुंबाने घरातच खोदली विहीर

नाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

लग्नानंतर अनैतिक प्रेमसंबंध ठेवणं पडलं महागात; आता दोघींसोबत दिवस वाटुन राहावं लागणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More