बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सातारा जिल्हा बँक ईडीच्या रडारवर; जरंडेश्वर प्रकरणात सातारा जिल्हा बँकेला नोटीस

सातारा | जरंडेश्वर साखर कारखान्याच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांमध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला अंमलबजावणी संचालनालयाकडून आज नोटीस बजावण्यात आली आहे. सातारा जिल्हा बँकेने जरंडेश्वर साखर कारखान्याला तब्बल 96 कोटींचं कर्ज दिलं आहे. त्यामुळे आता सातारा जिल्हा बँक ईडीचा रडारवर आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

2010 साली साताऱ्यातील जरंडेश्वर हा साखर कारखाना कर्ज थकबाकी असल्यामुळे लिलाव करून विकण्यात आला. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने हा कारखाना बाजारभावापेक्षा कमी किमतीत गुरु कमॉडीटिज या कंपनीला विकला असल्याचा थेट आरोप ईडीकडून करण्यात येत आहे. तसेच हा व्यवहार होत असताना नियमांचं पालन देखील झालं नसल्याचं ईडीने म्हटलं आहे.

दरम्यान, जरंडेश्वर साखर कारखान्यात सर्वाधिक शेअर्स असलेली स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याचं ईडीने आपल्या प्रेस नोटमध्ये नमूद केलं आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याचा आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये सातारा जिल्हा बँक आता अडचणीत येणार असल्याचं पाहायला मिळत आहेत.

साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना हा कर्ज थकबाकीमुळे लिलाव करण्यात आला असल्याचं बोलले जात असलं तरी या कारखान्याच्या संस्थापक आणि माजी चेअरमन शालिनीताई पाटील यांनी हा कारखाना अजित पवार यांनी बळकावला असल्याचा थेट आरोप केला आहे.

 

 

थोडक्यात बातम्या – 

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More