खासदार उदयनराजेंना अखेर अंतरिम जामीन मंजूर

सातारा | साताऱ्याचे खासदार उदयनराजे  यांना अखेर अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. सातारा जिल्हा सत्र न्यायालयाकडून हा जामीन मंजूर करण्यात आलाय. 

लोणंद येथील कंपनी मालकाला मारहाण आणि खंडणीप्रकरणी उदयनराजे आज पोलिसात हजर झाले होते. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून त्यांना कोर्टात हजर केलं नाही.

दरम्यान, उदयनराजेंच्या अटकेच्या निषेधार्थ साताऱ्यात नागरिकांनी उत्स्फूर्त बंद पाळला. तर शिवप्रतिष्ठानकडून उद्या सांगली जिल्हा बंदची हाक देण्यात आलीय. 

उदयनराजे प्रकरणात काय काय घडलंय?

साताऱ्याचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर लोणंद येथील सोना अलाईज कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी या प्रकरणाची म्हणावी तशी चर्चा झाली नाही. राजकारण्यांवर गुन्हे दाखल होण्याचा हा काही पहिलाच प्रकार नव्हता. यापूर्वीही अनेक राजकारण्यांवर अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले होते आणि ते त्या गुन्ह्यांमधून सहीसलामत सुटलेही आहेत. 

sataraa 1024x723 - खासदार उदयनराजे भोसले यांना अटक होणार की नाही?

 

उदयनराजेंना अटकपूर्व जामीन नाही…

उदयनराजेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र सत्र न्यायालयाने उदयनराजेंचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. त्यानंतर या प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहिलं जाऊ लागलं. सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात गेलेल्या उदयनराजेंना तिथंही दिलासा मिळाला नाही. अटकपूर्व जामीन न देण्याचा सत्र न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयानेही कायम ठेवला.

 

विश्वास नांगरे पाटलांचं वक्तव्य-

दरम्यानच्या काळात कायदा सर्वांसाठी समान आहे, त्यामुळे गरज पडल्यास उदयनराजेंना अटक करु, असं वक्तव्य कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. विश्वास नांगरे पाटलांना मात्र सोशल मीडियावर उदयनराजेंच्या रोषाचा सामना करावा लागला. त्यातच उच्च न्यायालयात गेलेल्या उदयनराजेंचा जामीन अर्ज फेटाळल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळालं.

satara 4 - खासदार उदयनराजे भोसले यांना अटक होणार की नाही?

 

उदयनराजेंविरोधात राजकीय डाव…

उदयनराजेंच्या समर्थकांनी मात्र हा राजकीय डाव असल्याचा आरोप केला. रामराजे नाईक निंबाळकर आणि उदयनराजे यांच्या युनियनच्या वादातून राजेंविरोधात सूड भावनेतून कारवाई केली जातेय, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.

 

Raje - खासदार उदयनराजे भोसले यांना अटक होणार की नाही?

काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा-

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजेंच्या समर्थनार्थ ट्विट केलं होतं. छत्रपतींच्या घराण्याला बदनाम करण्याचं षडयंत्र महाराष्ट्र खपवून घेणार नाही, असं ते म्हणाले तसेच ३६ हजार एकर जमीन असणारे खासदार उदयनराजे २ लाखांची खंडणी मागतील का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या भूमिकेला काँग्रेस नेते राजीव सातव यांनी लगेचच ट्विटरवर पाठिंबा दिला.

 

उदयनराजेंचं शक्तीप्रदर्शन-

-सोना अलायन्स कंपनीच्या मालकाकडे खंडणी मागितल्याच्या आणि मारहाण केल्याच्या आरोपावरुन उदयनराजेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून उदयनराजे साताऱ्यात आले नव्हते.

-उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यानंतर मात्र उदयनराजे साताऱ्यात येणार, अशा चर्चांना उधाण आलं होतं.

-अखेर शुक्रवारी सर्वांच्या उत्सुकतेला पूर्णविराम देत खासदार उदयनराजे साताऱ्यात दाखल झाले. रात्री ९ वाजता ते साताऱ्यात अवतरले.

-उदयनराजेंसोबत गाड्यांचा मोठा ताफा होता. हाहा म्हणता उदयनराजे आल्याची बातमी संपूर्ण साताऱ्यात वणव्यासारखी पसरली.

-उदयनराजे आल्याची बातमी कळताच शहराच्या कानाकोपऱ्यातून हजारो तरुण उदयनराजेंभोवती गोळा झाले.

-सदरबझारमध्ये उदयनराजे जेव्हा गाडीतून खाली उतरले, तेव्हा उपस्थित तरुणांच्या उत्साहाला उधाण आलं होतं.

-“आया है राजा,’ “वाघ है वाघ है, उदयनराजे वाघ है,’ “कोण म्हणतंय येत नाय”,  “एक नेता एक आवाज, उदयनमहाराज उदयनमहाराज”, अशा घोषणांनी यावेळी परिसर दणाणून निघाला.

-व्हॉट्सअॅपवरुन उदयनराजेंच्या आगमनाचे फोटो आणि व्हिडिओ शहर आणि जिल्ह्यात पोहोचल्याने सदरबझारमध्ये मोठी गर्दी झाली होती.

 

sataraaaa - खासदार उदयनराजे भोसले यांना अटक होणार की नाही?

 

-सदरबझारमध्ये पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानासमोरून उदयनराजे नागरिकांच्या भेटी- गाठी घेत राजपथावर आले.

-गर्दी यावेळी भारावून गेलेली पहायला मिळाली, अनेकजणांची उदयनराजेंच्या पाया पडण्यासाठी धडपड सुरु होती.

-उत्साही कार्यकर्त्यांनी उदयनराजेंच्या आगमनाच्या आनंदात फटाक्यांची जोरदार आतषबाजीही केली.

-शाहू चौक, शाही मशीद, टॅक्‍सी गल्ली, मोती चौक या परिसरात उदयनराजेंच्या गाठी घेण्यासाठी नागरिकांची अक्षरशः झुंबड उडाली होती…

-साताऱ्यात उदयनराजेंचा रोड शो सुरु होता. पोलिसांनी मात्र या रोड शोकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं.

-उदयनराजे पोलीस ठाण्यात हजर होतील असा सातारकरांचा कयास होता. त्यामुळे पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

-मात्र, उदयनराजे पोलिसात हजर झाले नाहीत. रोड शो संपल्यानंतर ते पुण्याला रवाना झाले होते.

 

Kesar - खासदार उदयनराजे भोसले यांना अटक होणार की नाही?

 

योग्यवेळी उदयनराजेंवर कारवाई- केसरकर

उदयनराजे साताऱ्यात येऊनही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. यावर माध्यमांनी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना छेडलं असता त्यांनी उदयनराजेंवर कारवाई होणार असल्याचे संकेत दिले होते. ‘सरकारनामा’ने दिलेल्या बातमीनूसार उदयनराजे साताऱ्यात येऊनही त्यांच्यावर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर केसरकरांनी संताप व्यक्त केला. तसेच या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.

दुसरीकडे एबीपी माझाने दिलेल्या बातमीनूसार दीपक केसरकर यांनी सातारा पोलिसांचं कौतुक केलं. रात्रीच्या वेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून सातारा पोलिसांनी कारवाई टाळली, असं केसरकर म्हणाले. तसेच योग्य वेळ आल्यावर उदयनराजेंवर कारवाई करु असंही त्यांनी सांगितलं. 

छत्रपती संभाजीराजे खासदार उदयनराजेंच्या पाठिशी-

Sambhajii

खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी उदयनराजेंच्या समर्थनार्थ फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. 

काल रात्री छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याशी माझी चर्चा झाली.ज्या अडचणीचा ते सामना करत आहेत त्या अडचणीत कोल्हापूर छत्रपती घराणे पुर्णपणे त्यांच्यासोबत आहे. कुठल्याही संकटाचा सामना कसा करायचा हे छत्रपती घराण्याला चांगल माहित आहे. संकट ही आम्हाला नवीन नाहीत.लवकरच ते यामधून बाहेर येतील याचा मला पूर्ण विश्वास आहे.

असं संभाजीराजेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं.