बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ब्रेकिंग! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढला, पुन्हा कडक लॉकडाऊन

सातारा | कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं होतं. परंतू गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट होताना दिसत आहे. त्यामुळे आकडेवारीवरून तरी कोरोना परिस्थिती पाहता अनलॉक केलं आहे. मात्र अशातच सातारा जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट वाढला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याचा चौथ्या स्तरात समावेश झाला आहे.

सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांत तब्बल 789 नवे रुग्ण सापडले असून त्यातील 13 जणांचा आपला प्राण गमवावा लागला आहे. ही धोक्याची घंटा असल्याचं समजून सातारा जिल्ह्यामध्ये तातडीने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात 1 लाख 94 हजार 640 जणांना कोरोनाची बाधा झाली असून 4666 जणांचा त्यामुळे मृत्यू झाला आहे. तर 7774 ऍक्टिव्ह रुग्ण सध्या सातारा जिल्ह्यात आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसांत दुकानं सकाळी 9 पासून दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहतील. शनिवार आणि रविवार पूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेश काढून ही माहिती दिली आहे.

दरम्यान, साताऱ्यामधील पर्यटन ठिकाणी शहरातील लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. मात्र वाढलेल्या पॉझिटिव्हिटी रेटमुळे या गर्दीला चाप बसणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘…तर मला आधी मुख्यमंत्रिपदावर बसवा’; छत्रपती संभाजीराजे भोसलेंचं मोठं वक्तव्य, पाहा व्हिडीओ

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

अखेर ठरलं! बारावीच्या निकालाचा ‘असा’ असणार फॉर्म्युला, शालेय शिक्षण विभागानं दिली माहिती

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस??; अमित शहांसोबतच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

रावसाहेब दानवेंनी सांगितला महाराष्ट्रातील करेक्ट कार्यक्रमाचा अर्थ, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More