साताऱ्यातील पिंपरी गावात ३०० जणांना गॅस्ट्रोची लागण

या विहिरीचं पाणी पिल्याने नागरिकांना त्रास होऊ लागला

सातारा | साताऱ्यातील पिंपरी गावात ३०० जणांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ४० जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

गावातील विहिरीतील पाणीपुरवठ्यामुळे हा प्रकार झाल्याचं समजतंय. विहिरीत घाण असल्याने आणि विहिरीभोवती कमालीची अस्वच्छता असल्याने या विहिरीतील पाणी दूषित झालं आहे.