शरद पवारांच्या हातून बालेकिल्ला निसटला, पवारांच्या शिलेदाराचा पराभव

Satara Loksaba Election | महाविकास आघाडीने आपल्या बालेकिल्ल्यात चांगलं मताधिक्य राखलं आहे. अनेक ठिकाणी निर्णायक विजय पाहायला मिळाले आहेत. तर काही ठिकाणी धक्कादायक परिस्थिती पाहायला मिळाली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा विजयी होतील अशी शक्यता होती. मात्र त्याठिकाणी काँग्रेसचे नेते बळवंत वानखेडे विजयी झाले होते. अशीच लढत सातारा लोकसभा मतदारसंघात (Satara Loksaba Election) पाहायला मिळाली होती.

पवारांच्या हातून बालेकिल्ला निसटला

सातारा लोकसभा मतदारसंघ (Satara Loksaba Election) हा शरद पवार यांचा बालेकिल्ला आहे. बारामतीआधी सातारा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांचं वर्चस्व आहे. मात्र आजच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने सर्व चित्र विचित्र झाल्याचं पाहायला मिळालं. शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ हा सातारा आहे. मात्र आता याजागेवर भाजपचे नेते उदयनराजे भोसले विजयी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र शशिकांत शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. अगदी कांटे की टक्कर पाहायला मिळाली. तसेच काही एक्झिट पोलने शशिकांत शिंदे विजयी होणार असल्याच्या शक्यता वर्तवली होती. मात्र उदयनराजे विजयी झाले आहेत. सातारकरांनी उदयनराजे यांच्या गादीला मान दिला आहे. (Satara Loksaba Election)

कराड दक्षिण मतदारसंघ ठरला टर्निग पॉईंट

सातारा लोकसभा मतदारसंघातील कराड दक्षिण मतदारसंघातून उदयनराजे यांना भरघोस मतदान झाल्याचं समजतंय. अर्थातच सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले विजय होण्यामागे दक्षिण कराड मतदारसंघ हा उदयनराजे यांच्या विजयासाठी टर्निग पॉईंट ठरला असल्याचं बोललं जात आहे.

News Title – Satara Loksaba Election In Udayanraje Bhosale Win Against Shashikant Shinde

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! वायनाड आणि रायबरेली या दोन्ही जागांवर राहुल गांधींचा दणदणीत विजय

रायगडने राखली अजित पवारांची लाज; 4 पैकी याच मतदारसंघात उघडलं विजयाचं खातं?

महाराष्ट्रातील धक्कादायक निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया!

फडणवीसांना जोर का झटका! माढयात मोहिते पाटील विजयी पथावर

भाजपवाले कोणाचेच नाहीत; संजय राऊतांच विधान चर्चेत