चिन्हामुळे झाला घोळ; शशिकांत शिंदेंच्या पराभवाचं कारण समोर

Satara Loksabah Election 2024 | काल लोकसभा मतदानाचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा विचार केला तर महाविकास आघाडीने 30 जागांवर मुसुंडी मारली आहे. तर दुसरीकडे महायुतीने केवळ 17 जागांवर विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात आपला जम बसवला आहे. पुन्हा एकदा भाजपचा पंतप्रधान होणार असला तरीही भाजपचा प्रचार पाहता म्हणाव्या अशा भाजपला जागा जिंकता आल्या नाहीत. अशातच आता राज्यातील सातारा लोकसभा मतदारसंघात (Satara Loksabah Election 2024) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून शशिकांत शिंदेंचा पराभव झाला. आता याचं कारण समोर आलं आहे. (Satara Loksabah Election 2024)

पिपाणी चिन्हामुळे शशिकांत शिंदेंच्या पराभवाची चर्चा

शशिकांत शिंदे यांचं तुतारी वाजणारा माणूस असं चिन्ह होतं. मात्र सातारा लोकसभा मतदारसंघात (Satara Loksabah Election 2024) मतदारांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा यासाठी एका उमेदावारास पिपाणी असं चिन्ह दिलं होतं.

एका बाजूला शशिकांत शिंदे हे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर लढत होते. तर दुसऱ्या बाजूला काही उमेदवार हे पिपाणी या चिन्हावर लढत होते. निवडणूक आयोगाने इतर काही उमेदवारांना पिपाणी हे चिन्ह दिलं होतं. याला शरद पवार गटाने विरोध केला होता. मात्र शेवटी जे व्हायचं तेच झालं अनेकांना पिपाणी आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हांच्या संभ्रमामुळे अनेकांनी पिपाणी चिन्हाला मत दिलं असल्याचं समोर आलं आहे.

साताऱ्यात पिपाणी हे चिन्ह संजय गाडे या उमेदवाराला देण्यात आलं होतं. त्यामुळे संजय गाडे यांनी आपल्या पिपाणी चिन्हावर निवडणूक लढवून शशिकांत शिंदे यांची मतं खाल्ली असावीत, असं म्हटलं जात आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात (Satara Loksabah Election 2024) जर पिपाणी हे चिन्ह नसतं तर विजय हा शशिकांत शिंदे यांच्या पथ्यावर पडला असता अशी चर्चा आहे. मात्र पिपाणी चिन्हामुळे शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला आहे. दरम्यान शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले यांना किती मतं पडली आहेत हे खालीलप्रमाणे नमूद करण्यात आलं आहे.

शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले मतं

साताऱ्यात उदयनराजे भोसले विरूद्ध शशिकांत शिंदे यांची टफ फाईट पाहायला मिळाली. यामध्ये उदयनराजे भोसले यांनी विजय मिळवला आहे. उदयनराजे यांना एकूण 5 लाख 71 हजार 134 मतं पडली. तर शरद पवार यांचा शिलेदार शशिकांत शिंदे यांना 5 लाख  38 हजार 363 मतं पडली. दरम्यान शशिकांत शिंदे हे 32 हजार 771 मतांनी पराभूत झाले आहेत.

News Title – Satara Loksabah Election 2024 Shashikant Shinde Loss Due To Independent Candidate Sanjay Gade

महत्त्वाच्या बातम्या

‘सरकारमध्ये येणार पण..’;चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांचं BJP वर दबावतंत्र, केली मोठी मागणी

मोठी बातमी! नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणेंच्या ताफ्यातील गाडीचा अपघात

एकनाथ शिंदेंचे अनेक खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात?

घरच्या आमदारानं केला शशिकांत शिंदेंचा घात, अशी पडली साताऱ्यात जागा!

दारुण पराभवानंतर राजू शेट्टी यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टनं खळबळ