Satara Loksabha Election 2024 | नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या आहेत. मात्र राज्यात शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात (Satara Loksabha Election 2024) पिपाणी चिन्हामुळे शशिकांत शिंदे यांची मतं ही पिपाणी चिन्हाला गेल्याचं दिसत आहे. या चिन्हामुळे गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान पिपाणी या चिन्हामुळे दीड लाख मतं ही गेली असल्याने साताऱ्याची सीट पडल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी माहिती दिली आहे. (Satara Loksabha Election 2024)
पिपाणीमुळे तुतारीची मतं घटली
सातारची जागा ही 45 हजारांनी पडली आहे. त्यात 37 हजार मते ही पिपाणीला पडल्याचं दिसून आलं आहे. बारामती, बीडमध्ये ज्या अपक्ष उमेदवारांना मतं मिळाली होती. ती मते ही बहुजन समाजाच्या उमेदवारांपेक्षाही अधिक असल्याचं बोललं जात आहे, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. (Satara Loksabha Election 2024)
आम्ही भाषण करत असताना आम्ही तुतारी चिन्ह सांगायचो पण लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे काही लोकांनी तुतारी समजून पिपाणी या चिन्हाला मत दिलं आहे. याचा फटका हा आम्हाला बसला आहे. मात्र हिच चूक लक्षात आणून दिल्यानंतरही निवडणूक आयोगाने याकडे दुर्लक्ष केलं असल्याचं जयंत पाटील म्हणाले आहेत.
बीड मतदारसंघातही तिच परिस्थिती
तसेच बीड लोकसभा मतदारसंघातही एक कमाल झाली आहे. बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते बजरंग सोनवणे यांनी 6 हजार 553 मतांनी विजय मिळवला आहे. तर बीड मतदारसंघातच पिपाणी या चिन्हावर लढणारे उमेदवार अशोक थोरात यांना 54 हजार 850 मते मिळाली आहेत. ते तिसऱ्या क्रमांकावर आले.
दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघाच भाजपकडून उदयनराजे भोसले विरूद्ध राष्ट्र्वादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांच्यात लढत झाली. अनेकांचं लक्ष हे सातारा लोकसभा मतदारसंघाकडे (Satara Loksabha Election 2024) लागलं होतं. मात्र ऐनवेळी पिपाणी चिन्हाने घोळ घातल्याने शशिकांत शिंदेंचा पराभव झाल्याचं समजतंय.
साताऱ्यात उदयनराजे यांना एकूण 5 लाख 71 हजार 134 मतं पडली. तर शरद पवार यांचा शिलेदार शशिकांत शिंदे यांना 5 लाख 38 हजार 363 मतं पडली. दरम्यान शशिकांत शिंदे हे 32 हजार 771 मतांनी पराभूत झाले आहेत.
News Title – Satara Loksabha Election 2024 Shashikant Shinde Loss Due To Independent Candidate Symbol Of Pipani
महत्त्वाच्या बातम्या
अरे व्हा! या कारने घातलीये तरुणाईला भुरळ; किंमत व स्पेसिफिकेशन काय?
…तर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत; ‘या’ नेत्याने केला सर्वात मोठा दावा
इंडिया आघाडीच्या ट्विटने उडवली भाजपवाल्यांची झोप; पाहा काय आहे ट्विट
या राशीच्या व्यक्तींना आर्थिक धनलाभ संभवतो
अभिनेता शशांक केतकर यांची पोस्ट चर्चेत, म्हणाला…