साताऱ्यात शशिकांत शिंदे विरूद्ध उदयनराजे भोसले; कोण आघाडीवर? जाणून घ्या अपडेट

Satara Loksabha Election 2024 | सातारा लोकसभा मतदारसंघ (Satara Loksabha Election 2024) हा राष्ट्रावादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा प्रतिष्ठेचा मतदारसंघ आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ हा शरद पवार यांचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून शशिकांत शिंदे लढले होते. तर त्यांच्याविरोधात भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली होती. दोन्हीही तुल्यबळ उमेदवार आहेत. अशातच आता सातारा लोकसभा मतदारसंघातून (Satara Loksabha Election 2024) मोठी बातमी समोर आली आहे.

शशिकांत शिंदे हे 9 हजार मतांनी आघाडीवर

सातारा लोकसभा मतदारसंघातून (Satara Loksabha Election 2024) उदयनराजे विरूद्ध शशिकांत शिंदे यांच्यात लढत होती. सध्या शशिकांत शिंदे हे 9 हजार मतांनी आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता उदयनराजे भोसले यांच्या अडचणीत वाढ होऊ लागली आहे.

शशिकांत शिंदे यांच्यामागे शरद पवार यांचा हात असल्याने अनेकजण शशिकांत शिंदे यांच्याबाजूने असल्याचा अंदाज एक्झिट पोलने अंदाज वर्तवला. तर दुसरीकडे गादीचा वारसदार म्हणून उदयनराजे भोसले यांच्याकडे पाहिलं जातं. मात्र आता अंतिम टप्प्यात काय घडेल काय बिघडेल हे काही तासांमध्ये स्पष्ट होईल.

शशिकांत शिंदे विरूद्ध उदयनराजे भोसले

बारामती लोकसभा मतदारसंघाप्रमाणे सातारा लोकसभा मतदारसंघ हा शरद पवार यांच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. कारण सातारा लोकसभेत यशवंतराव चव्हाण यांचे विचार आहेत. तसेच सातारा हे पुरोगामी विचारांचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. याच साताऱ्यात शरद पवार यांचा शिलेदार शशिकांत शिंदे विरूद्ध उदयनराजे भोसले यांच्यात लढत होताना दिसत आहे. सध्या जरी शशिकांत शिंदे आघाडीवर असले तरीही अंतिम टप्प्यात निकाल जाहीर होईल.

अपडेट-

उदयनराजे पहिल्यांदा आघाडीवर, शशिकांत शिंदे पिछाडीवर

महत्त्वाच्या बातम्या

कल्याणमध्ये मतमोजणी खोळंबली, नेमकं काय घडलं?

शाहू महाराज vs संजय मंडलिक; कोल्हापुरात कुणी घेतली आघाडी?

सांगलीत विशाल पाटील सुसाट; चंद्रहार पाटील, संजयकाका पिछाडीवर

आता एका क्लीकवर जाणून घ्या कोणाची आघाडी तर कोणाची पिछाडी?

शरद पवारांचा अजितदादांना दणका; चौथ्या फेरीतही अमोल कोल्हेंची मोठी आघाडी