Satara Loksabha Election | सातारा लोकसभा मतदारसंघातून (Satara Loksabha Election) नुकतीच एक मोठी अपडेट समोर आली. सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे आघाडीवर होते. यावेळी उदयनराजे यांना आनंदाश्रू अनावर झाले आहेत. साताऱ्यातील जलमंदिर येथे उदयनराजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. उदयनराजे भोसले यांनी आता शरद पवार गटाचे शिलेदार आणि विरोधक शशिकांत शिंदे यांना पिछाडीवर सोडून स्वत: आघाडीवर गेले असल्याची माहिती समोर आली आहे. (Satara Loksabha Election)
उदयनराजे भावूक
उदयनराजे भोसले हे निकालाच्या पहिल्या फेरीपासून पिछाडीवर पाहायला मिळत होते. 14 व्या फेरीत उदयनराजेंनी मुसंडी घेत शशिकांत शिंदेंना मागे टाकल्याचं दिसून आलं. उदयनराजे भोसले हे 14 व्या फेरीत 4000 मतांनी आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. उदयनराजे भावूक झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
शशिकांत शिंदे पिछाडीवर
पंधराव्या फेरी अखेर उदयनराजे यांना 4, 79, 304 मतं मिळाली आहेत. 4, 69, 568 मत मिळाली आहे. अद्यापही इतर काही फेऱ्या बाकी आहेत. त्यामुळे आता लगेचच विजय घोषित करणं कठिण राहणार असल्याचं बोललं जात आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात (Satara Loksabha Election) उदयनराजे यांना भाजपने उमेदवारी दिली होती. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली. मात्र आता 13 व्या फेरी अखेर शशिकांत शिंदे पिछाडीवर गेले आहेत. (Satara Loksabha Election)
अद्यापही आणखी काही फेऱ्या बाकी आहेत. सर्वांचं लक्ष हे या निकालांच्या फेऱ्यांकडे लागलं आहे. दरम्यान यंदा साताऱ्यात एकूण सरासरीपेक्षा एकूण 63.16 टक्के मतदान झाले. तर साताऱ्यात 11 लाख 93 हजार 492 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
News Title – Satara Loksabha Election 2024 Udyanraje Bhosale Overtake To Shashikant Shinde
महत्त्वाच्या बातम्या
महाविकास आघाडीने विजयाचं खातं उघडलं; ‘या’ नेत्याने मारली बाजी
काँग्रेस सत्तेत येणार?, भाजपविरोधात टाकला आतापर्यंतचा सर्वात मोठा डाव
दिंडोरीत शरद पवारांच्या उमेदवाराला मोठा धोका, अपक्ष भगरेंना मोठं मतदान
वंचित मतांपासून सुद्धा वंचित!, पुणे, बीड, धाराशिव, परभणी आणि अकोल्यात फक्त एवढी मतं
सर्वात मोठी बातमी! सेक्स स्कँन्डल प्रकरणातील आरोपी प्रज्वल रेवन्नाचा पराभव