राजे की पाटील? नेमकी कुणाला मिळणार ‘राष्ट्रवादी’ची उमेदवारी???

सातारा | सातारा लोकसभा मतदारसंघात नेमकी कुणाला राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. श्रीनिवास पाटील आणि शरद पवार यांनी एकत्र प्रवास केल्यामुळे या चर्चेने पुन्हा वेग पकडला आहे. 

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले पक्षाला जुमानत नाहीत. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील सर्व आमदार उदयनराजेंच्या विरोधात आहेत. 

नुकतीच या आमदारांनी उदयनराजेंना उमेदवारी न देण्याची मागणी थेट शरद पवारांकडे केल्याचं समोर आलं होतं. पवारांनी मात्र अशी कुणाचीच मागणी नसल्याचं स्पष्ट केलं होतं. 

दरम्यान, सिक्कीमचे माजी राज्यपाल साताऱ्यातून लढण्यासाठी उत्सुक आहेत. पवार आणि त्यांच्या भेटीमुळे साताऱ्याच्या उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-ब्राह्मण समाजाच्या आरक्षणाला मंत्री महादेव जानकर यांचा पाठिंबा

-पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त केल्याची घोषणा; मात्र तेवढ्या रुपयांची कपात नाहीच!

-बाबासाहेबांच्या स्मारकासाठी राज्य गहाण टाकण्याची नाही, तर इच्छाशक्तीची गरज!

-भाजप सरकारचा मोठा निर्णय; पेट्रोल 5 रूपयांनी स्वस्त

-किमान 3-4 मंत्र्यांना कपडे काढून मारा, पोलिस तुम्हाला काहीच करणार नाही!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या