बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादी गॅसवर?, साताऱ्यात मोठा राजकीय भूकंप घडण्याची शक्यता

सातारा | जिल्हा मध्यवर्ती बॅंक निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा केवळ एका मताने पराभव झाला. या पराभवानंतर आमदार शशिकांत शिंदेंनी न्यूज 18 लोकमतला मुलाखत दिली. मी विश्वासामध्ये राहिलो आणि माझा विश्वासघात केला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. उमेदवारीसाठी चर्चेची गऱ्हाळे चालू राहिली आणि ती तशीच राहिली म्हणून मी गाफील राहिलो, मला वाटलं सगळं मिटलं म्हणून मी निर्धास्त राहिलो.

जिल्ह्याच्या राजकारणात मला अडथळा समजणाऱ्या लोकांनीच माझा पराभव केला असल्याचा दावा शिंदेंनी यावेळी केला. मात्र पराभवामुळे खचून न जाता जावळीमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उभा करणार असल्याचा निर्धार शशिकांत शिंदें यांनी यावेळी व्यक्त केला. या निवडणुकीच्या निकालानंतर साताऱ्यात राष्ट्रवादीचे कार्यालय फोडण्याची घटना घडली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साताऱ्यात पोहोचले व शशिकांत शिंदे यांची त्यांनी भेट घेतली.

आमदार शशिकांत शिंदे आणि शरद पवार यांच्यात सर्किट हाऊसमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीनंतर शिदेंनी माध्यमांशी संवाद साधला. निवडणुकीत विजयी झालेले ज्ञानदेव रांजणे यांना सर्वसामान्य कार्यकर्ता संबोधत त्यांच्या मागे वेगळी शक्ती असल्याचं शिंदे म्हणाले.

मी लढणारा कार्यकर्ता आहे म्हणून या निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुकीत देखील मला पाडण्याचं षडयंत्र करण्यात आलं. आता मला राजकारणात काही गमवण्यासारखं राहिलेलं नाही. येत्या 25 तारखेला मी माझ्या राजकीय कारकीर्दीबाबत निर्णय जाहीर करेल, अशी घोषणा यावेळी शशिकांत शिंदे यांनी केली. त्यामुळे आता शशिकांत शिंदे नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

तळीरामांना आता दारुवर मिळणार मोठी सूट, फक्त एवढीच आहे अट

नाना पटोलेंना मोठी लॉटरी?, ठाकरे सरकार ‘हा’ निर्णय घेण्याची शक्यता

‘या’ भागात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, शेतीचंही मोठं नुकसान

पुण्यात मोठी खळबळ, आमदाराच्या भावाच्या कार्यालयावर मोठा हल्ला

सोनं ‘इतक्या’ रुपयांनी महागलं, वाचा आजचे ताजे दर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More