उदयनराजेंच्या अटकेमागे भाजपाध्यक्ष अमित शहांचा फोन?

मुंबई | उदयनराजे प्रकरणावरुन राष्ट्रवादीवर टीका करणारे भाजपचे माजी आमदार दिलीप येळगावकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी समाचार घेतला.

उदयनराजे प्रकरणात भाजपाध्यक्ष अमित शहांचा फोन कोणाला गेला होता? सोना अलाइन्स कंपनीच्या मालकाचा अमित शहांशी काय संबंध? शहांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून काय सांगितले ? त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कोणाला फोन केला?, याची माहिती येळगावकरांनी पहिली घ्यावी. आधी स्वत:च्या पक्षात काय चाललंय ते पाहावं, मग राष्ट्रवादीत डोकवावं, असं माने म्हणाले.

सुनील माने यांच्या या वक्तव्यांमुळे उदयनराजेंच्या अटकेसाठी खुद्द अमित शहांनी फोन केला होता का? असा सवाल उपस्थित होतोय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या