कोल्हापूर महाराष्ट्र

“कृषी कायदा बदलणार नाही, अशी घोषणा करणारे चंद्रकांत पाटील देशाचे पंतप्रधान की कृषीमंत्री?” 

कोल्हापूर | कृषी कायद्यात काही बदल होतील मात्र तो कायदा बदलणार नाही,  असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी म्हटलं होतं. पाटलांच्या या वक्तव्यावर राज्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी टीका केली आहे.

कृषी कायदा बदलणार नाही, अशी घोषणा करणारे चंद्रकांत पाटील देशाचे पंतप्रधान आहेत की कृषीमंत्री?, असा सवाल करत हसन मुश्रीफ यांनी पाटलांवर निशाणा साधला आहे.

राज्यातील जनतेने अत्यावश्यक सेवा वगळून कडकडीत बंद पाळावा. हा बंद शांततेत पार पाडण्याचं आवाहनही हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.

दरम्यान, हिंमत असेल तर बांधावर जा, शेतकरी पायातलं काढून तुम्हाला सांगेल, असं म्हणत गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी टीका केली. यासोबतच त्यांनी भारत बंदसाठी सर्वांनी आपल्या घरासमोर काळा झेंडा लावा. माझा काय संबंध असं न म्हणता प्रत्येकाने बंदमध्ये सहभागी व्हावे, असं पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

देशातील शेतकरी आंदोलनादरम्यान केरळ सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

‘शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणं जगातील प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य’; राऊतांचं नागरिकांना आवाहन

‘माझ्या बापाला माझा पाठींबा असणारच!’; अभिनेता हेमंत ढोमेचा शेतकरी आंदोलनाला पाठींबा

“शेतकऱ्यांचा नावाखाली राजकारण करणाऱ्यांचा आजचा बंद आहे पण… “

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमीच- राजेश टोपे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या