महाराष्ट्र मुंबई

“पालकमंत्री बदलणं पेट्रोल पंपावरील कामगार बदलण्यासारखं नाही”

मुंबई | पालकमंत्री बदलणं म्हणजे पेट्रोल पंपावरील कामगार बदलण्यासारखं नाही, अशा शब्दांत पालकमंत्री सतेज पाटील यांनी माजी खासदार धनंजय महाडिक यांना प्रतित्तुर दिलंय.

जिल्ह्याची परिस्थिती गंभीर झाली असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा निष्क्रिय पालकमंत्र्याना बदलून धडाडीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे पालकमंत्रीपद सोपवावं, अशी मागणी माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केली होती. यावरून सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत महाडिक यांच्याव जोरदार टीकास्त्र सोडलंंय.

माझ्यावर निष्क्रियतेचा टीका करताना धनंजय महाडिक यांनी त्यांचा लोकसभा निवडणुकीत पावणे तीन लाख मतांनी पराभव झाला होता हे पाहावं. यावरुन ते किती सक्रिय होते हे स्पष्ट होते. त्यामुळेच नागरिकांना त्यांना निष्क्रिय ठरवले,असा टोला सतेज पाटील यांनी लगावलाय.

स्वत:चा कारखाना सक्षमपणे चालविता येत नाही. तीन हंगाम कारखाना चालवता आला नाही. अशांना भाजपने साखर तज्ज्ञ म्हणून समितीवर घेणं हे हास्यास्पद आहे. ते कारखाने आणि कारखानदारीशी निगडीत प्रश्न काय मांडणार ?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या-

‘आयसीसी’नं महेंद्रसिंग धोनीसाठी ट्विट केला खास व्हिडीओ

‘हे’ चार वर्ल्ड रेकॉर्ड आहेत केवळ महेंद्र सिंग धोनीच्या नाव

धोनीच्या निवृत्तीवर विराटची भावूक प्रतिक्रिया, म्हणाला…

काळजी घ्या!; कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना पुन्हा होतोय कोरोना!

धोनीच्या निवृत्तीनंतर झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी बीसीसीआयकडे केली ‘ही’ खास मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या