Top News कोल्हापूर महाराष्ट्र

“लोकांनी फरफटत यावं अशी भाजपची इच्छा, शेवटी पेरलं तेच उगवलं”

कोल्हापूर |  विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या झालेल्या निवडणुकीत भाजपला अनपेक्षित असा निकाल लागला. सोशल माध्यामांवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांबाबत मिम्स व्हायरल होत आहेत. यासंबंधात गृहराज्यमंत्री सतेज पाटलांना प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी उत्तर देताना भाजपला टोला लगावला.

मी याचं समर्थन करणार नाही. पण भाजपने ज्या सोशल मीडियाचा वापर करुन 2014 साली सत्ता मिळवली आता त्याच सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका होत असल्याचं सतेज पाटील म्हणाले.

भाजपने जे पेरलं तेच उगवलं. भाजपने जे पेरलं तेच उगवलं. लोकांनी फरफटत यावं, अशी भाजपची अपेक्षा असल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. कोल्हापूर ब्रँड कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीची चांगली मोट बांधली असल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे. महाविकासआघाडीने भाजपचे बालेकिल्ला असलेले पुणे आणि नागपूर हे मतदारसंघ मिळवल्याने भाजपला मोठा धक्का बसलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“आत्मचिंतनाची बैठक त्यांच्याकडे जास्त; आम्ही कृती आणि अॅक्शनवाले”

“कोरोना महामारी संपेल हे स्वप्न जगाने पाहण्यास हरकत नाही”

कोरोनाच्या लसीचा डोस घेतलेले हरियाणाचे मंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण!

पुण्यापासून जवळ असलेल्या ‘या’ भागात उद्यापासून संचारबंदी

लस हे अमृत नाही, जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत…- राजेश टोपे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या