मुकेश अंबानी देशवासीयांना देणार मोठं गिफ्ट, आता 4G-5G इंटरनेट नाही तर थेट..

Satellite Internet in India | भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी जागतिक बाजारात धमाका केला आहे. भारतात सॅटेलाईन इंटरनेट सुरु करण्याच्या स्पर्धेत मुकेश अंबानी यांनी बाजी मारली आहे. यामध्ये अमेझन डॉट कॉमपासून एलन मस्कची स्टारलिंक स्पर्धेत होती. त्यात अंबानी यांनी बाजी मारली आहे.

अंबानी यांची जिओ कंपनी ही त्यांचे पुत्रे अनंत अंबानी यांच्याकडे आहे. आता जिओ प्लॅटफॉर्म आणि झक्जमबर्गचे एसईएस या जॉइंट व्हेंचर्सला गीगाबाइट फायबर इंटरनेटसाठी मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता लवकरच वापरकर्त्यांना उपग्रहाद्वारे इंटरनेट सुविधा मिळेल.

भारतात सॅटेलाईन इंटरनेट सुविधा लवकरच मिळणार

उपग्रहाद्वार वेगवान इंटरनेट सेवा देण्याचे काम हे प्लॅटफॉर्म करणार आहे. इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटरने यासाठी जिओ अन् एसईएसला मंजुरी दिली आहे. आता पुढील मंजूरी दूरसंचार विभागाकडून घ्याव्या लागतील. त्यानंतर देशात उपग्रहाद्वारे इंटरनेट सेवा दिली जाईल.

काही मीडिया रिपोर्टनुसार, उपग्रह कनेक्शन सेवेसंदर्भात (Satellite Internet in India) तीन मान्यता देण्यात आल्या आहेत. याचा मुख्य उद्देश हा फास्ट इंटरनेट सुविधा देणे असणार आहे. आता इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशनकडून मंजुरी मिळाल्यानंतर भारतात उपग्रह इंटरनेट सेवा सुरु केली जाईल.

इंटरनेट सुरु करण्याच्या स्पर्धेत मुकेश अंबानी यांची बाजी

या स्पर्धेत अमेझन डॉट कॉमपासून एलन मस्क यांची स्टारलिंक कंपनी होती. मात्र, त्यात मुकेश अंबानी यांनी बाजी मारत यांना मागे टाकलं आहे. यासोबतच अजून एका कंपनीला भारतात उपग्रह चालवण्याची मान्यता मिळाली आहे.

जगभरात आता उपग्रहाद्वारे इंटरनेट (Satellite Internet in India) सेवा देण्याचे तंत्रज्ञान वाढत चालले आहे. भारतात सॅटेलाइट ब्रॉडबँड सर्व्हीस मार्केटमध्ये गेल्या पाच वर्षांत 36% वाढ झाल्याची माहिती आहे.

News Title – Satellite Internet in India

महत्त्वाच्या बातम्या-

“विधानसभेपूर्वी पंकजा मुंडेंचं पुनर्वसन करा,अन्यथा..”; बीडमधील बॅनरने राजकारण तापलं

कंगनाला मिळणार ‘या’ सुखसुविधा, खासदार झाल्यानंतर बदललं आयुष्य

रोज सेक्स करणं चांगलं आहे का?, तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती

बाळाला सेरेलॅक खाऊ घालताय?, अगोदर ही धक्कादायक माहिती नक्की जाणून घ्या

विद्या बालनच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओची सगळीकडे एकच चर्चा!