बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिवंगत आमदार रमेश वांजळेंच्या दोन्ही सख्ख्या मेव्हुण्यांचं कोरोनाने निधन

पुणे | कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच जात आहे. कोरोनाने कित्येक कुटुंब उद्धवस्त केली आहेत. कोरोना बाधितांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. अशातच दिवंगत सोनेरी आमदार रमेश वांजळे यांच्या सख्ख्या मेव्हुण्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सतीश कुंडलिक गवारे आणि दत्तात्रय कुंडलिक गवारे अशी भावंडाची नावं आहेत. घरातील दोन्ही कर्ते पुरूष अचानक गेल्याने गवारे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. काही दिवसांपुर्वी सतीश गवारे आणि दत्तात्रय गवारे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर दोघांनाही उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मोठे भाऊ सतीश गवारे यांना पुण्याजवळील उरळी कांचन या ठिकाणी उपचार सुरू होते तर दत्तात्रय गवारेंवर शिक्रापूरमधील एका रुग्णालयात उपचार सुरू होते.

सतीश आणि दत्तात्रय यांची अचानक प्रकृती बिघडली त्यामुळे त्यामुळे त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र 17 मेला रात्री सतीश गवारे यांचं निधन झालं तर बारा तासानंतर दत्तात्रय गवारे यांचं 18 मेला कोरोनाने मृत्यू झाला. अवघ्या बारा तासांच्या अंतरानं या दोन्ही सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. त्यामुळे गवारे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, स्व. आमदार रमेश वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे या सतीश आणि दत्तात्रय यांच्या सख्ख्या बहीण आहेत. हर्षदा यांनीही आपल्या भावांच्या उपचारासाठी खूप धावपळ केली मात्र कोरोनाने त्यांच्या दोन्ही भावांना हिरावून घेतलं.

थोडक्यात बातम्या- 

अजित पवारांना प्रमुख करणं म्हणजे लांडग्यानं मेंढरांचं नेतृत्व करण्यासारखं आहे- गोपीचंद पडळकर

“देवेंद्रजी काय राव तुम्ही कधीही मदतीला पोहोचता, मग इथे मुख्यमंत्र्यांनाही निघावं लागतं ना”

‘कोरोनामुळे आपण जवळची माणसं गमवलीत’; डॉक्टरांशी संवाद साधताना मोदी झाले भावूक

“सरकार आल्यापासून हवेत गेलेले उद्धव ठाकरेंचे पाय जमिनीवर आले, आनंद आहे”

धक्कादायक! डिस्चार्ज मिळण्याच्या काही तासांपूर्वी कोरोना रुग्णाची रुग्णालयातच आत्महत्या

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More