Top News

कॅंडीक्रश गेम सहकार आयुक्तांच्या मुळावर; जावं लागलं कायमचं घरी!

मुंबई | महाविकास आघाडीच्या सरकारनं दोन लाख रूपयांपर्यंतची शेतकरी कर्जमाफी केली होती. यासंदर्भात शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर क्लिक केल्यावर कँडीक्रश गेम चालू होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यामुळे प्रभारी सहकार आयुक्त सतिश सोनी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

संबंधित लिंक ही नजरचुकीने जाऊ शकते. कदाचित यामागे सरकारला बदनाम करण्याच्या डावही असू शकतो, अशी शक्यता सतिश सोनी यांच्या निलंबनात नमूद करण्यात आली आहे.

शेतकरी योजनेसाठी सहकार आयुक्तांनी तयार केलेल्या पत्रात कर्जमाफीची अचूक वेबसाइटची  लिंक कृषीखात्याला दिली होती. मात्र ही लिंक ओपन करताच कँडीक्रश गेम चालू होत असल्याची चूक कृषी खात्याच्या आयुक्तांना लक्षात आल्यावर त्यांनी सरकारला याबाबत माहिता दिली होती.

दरम्यान, सहकार आयुक्त सतिश सोनी यांच्याकडे गेले सहा महिने या पदाचा अतिरिक्त भार होता. आता त्यांच्या  निलंबनानंतर नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांच्याकडे या पदाची पूर्णवेळ पदभार देण्यात आला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“शिवसेनेने सदैव इंदिरांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि मर्दानगीचा आदर केला”

‘हम ईट का जवाब पत्थर से देना जानते है’; काँग्रेसच्या राऊतांचा शिवसेनेला इशारा

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या