Pune Crime l सध्या पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. अशातच 9 डिसेंबर रोजी पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचं भर चौकातून अपहरण करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. त्यानंतर आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतिश वाघ यांचं अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली.
हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर :
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण झाल्यानंतर चालत्या गाडीतच त्यांचा खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच चालत्या गाडीत खून केल्यानंतर मृतदेह शिंदवणे घाटात टाकण्यात आल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.
तसेच सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर धावत्या गाडीतच त्यांचा तिक्ष्ण शस्त्राने व लाकडी दांडक्याने मारहाण करून व गळा दाबून त्यांचा खून करण्यात आलाआहे. तसेच या धक्कादायक घटना प्रकरणी पोलिसांनी नवनाथ गुरसाळे आणि पवन शर्माला अटक केली आहे.
Pune Crime l पोलिसांकडून कसून तपास सुरु :
या घटनेनंतर सतीश वाघ यांच अपहरण व खून प्रकरणात पाच आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, आता या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून आणखी दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांनीच सतीश वाघ यांचे अपहरण केलं असल्याची माहिती मिळाली आहे.
परंतु, ज्या गाडीत सतीश वाघ यांचे अपहरण केले होते त्या गाडीत आणखी दोन जणं आधीपासूनच होते. त्यामुळे या चारही आरोपींनी सतीश वाघ यांचा गाडीतच खून केल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. तसेच आत्तापर्यंत या प्रकरणात चौघांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, तर अन्य एकाचा शोध पुणे पोलिसांकडून सुरु आहे.
News Title : Satish Wagh Murder Case Update
महत्वाच्या बातम्या –
“…तरच डिसेंबरचा हप्ता मिळणार”; लाडक्या बहीणींनो अर्जाला ‘ही’ कागदपत्रे जोडली तर होती ना?
विरोधी पक्षनेते पद कोणाला मिळणार? नार्वेकरांनी दिली माहिती
‘वेलकम’ फेम अभिनेत्याचं एअरपोर्टवरून अपहरण!, सिनेइंडस्ट्रीत एकच खळबळ
अखेर मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात घेतला असा निर्णय?
संजय राऊतांच्या सख्ख्या भावाचा ठाकरेसेनेला घरचा आहेर; थेट म्हणाले…